AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Facts: खापरखवल्या सापाच्या शेपटीचा फटका बसताच अर्धांगवायूचा झटका? सत्य वाचून चकीत व्हाल

Bombay Shield Tail Paralysis: खापरखवल्या हा अत्यंत दुर्मिळ साप आहे. तो दूर जंगल प्रदेशात, जंगला शेजारील वसाहतीत आढळतो. या सापाची शेपटी ही चपटी आणि जाड असल्याने त्याच्याविषयी अनेक गैरसमज आहेत.

Snake Facts: खापरखवल्या सापाच्या शेपटीचा फटका बसताच अर्धांगवायूचा झटका? सत्य वाचून चकीत व्हाल
खापरखवल्या सापामुळे अर्धांगवायूचा झटका?
| Updated on: Oct 04, 2026 | 2:20 PM
Share

Bombay Shield Tail Paralysis: खापरखवल्या हा अत्यंत दुर्मिळ साप आहे. तो पश्चिम घाटात, सह्याद्रीच्या डोंगररांगात, दाट जंगलात आणि पाणथळ ठिकाणी आढळतो. या सापाचे वैशिष्ट्ये म्हणजे तो माती उकरतो. त्याला बॉम्बे शिल्टटेल असे एक नाव आहे. मनुष्य वस्तीपासून तो जरा फटकून वागतो. पण जंगला लगतच्या शेतात त्याचे दर्शन होते. स्थानिक लोक या सापाला खापरखवल्या अथवा माती ढकल्या असेही म्हणतात. हा साप लवकर नजरेस पडत नाही. त्याची शेपटी टोकदार नसून चपटी आणि जाड असते. यामुळे काही गैरसमज आहेत. या सापाची शेपटीचा मार बसल्यास अर्धांगवायूचा झटका बसतो असा गैरसमज आहे. पण त्यात काहीच तथ्य नाही. उलट हा साप बुजरा असतो.

या सापाची वैशिष्ट्ये काय?

बॉम्बे शिल्डटेल अथवा खापरखवल्या हा साप दक्षिण भारतात आणि सह्याद्री डोंगररांगेत आढळतो. महाराष्ट्रात महाबळेश्वर, लोणावळा, कोयना, सावंतवाडी या पट्ट्यात तो नजरेस पडतो. या सापाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे तो पूर्णपणे बिनविषारी असतो. मानवाला अथवा मोठ्या प्राण्यांना त्याच्यापासून कोणताही धोका नसतो. तो त्याच्या भक्ष्याव्यतिरिक्त इतरांवर हल्ला करत नाही.

हा साप आकाराने खूप लहान म्हणजे फारतर 30 ते 35 सेमी लांबीचा असतो. याचे शरीर दंडगोलाकार, गुळगुळीत आणि चकचकीत असते. तो काळ्या अथवा गडद तपकिरी रंगाचा असतो. त्यावर पिवळसर ठिपके अथवे पट्टे असतात. जमिनीखाली अथवा ओल्या मातीत हा साप आढळतो. तो माती उकरत असल्याने त्याला माती ढकल्या, माती उकऱ्या असेही म्हणतात.

या सापाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे त्याची शेपटी. या सापाची शेपटी टोकदार नसते तर चपट आणि ढालीसारखी दिसते. ही शेपटी जाड असते. जमिनीत बीळ करताना त्याला या शेपटीचा उपयोग होता. टणक शेपटी त्याला जमीन भुसभुशीत करण्यासाठी उपयोगी ठरते. या सापाची शेपटी लागल्याने अर्धांगवायूचा झटका येत नाही. हा बिनविषारी साप आहे. तो माणसांवर हल्ला करत नाही. गांडूळ आणि लहान कीटक हे त्याचे भक्ष्य आहेत.

हा साप जमिनीखाली अथवा पानांच्या खाली दडलेला असतो. या सापावर अजूनही मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक संशोधन झालेले नाही. हा साप शांत स्वभावाचा आणि लाजाळू मानल्या जातो. तो सहसा दंश करत नाही. जास्त डिवचल्यास तो शेपटीची ढाल करतो.

Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी