AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाने मुस्लिम मुलीशी लग्न करू नये म्हणून… अभिनेत्याने दिली होती थेट वॉर्निंग

अभिनेते दारा सिंह यांनी रामानंद सागर यांच्या रामायणामध्ये हनुमानाची भूमिका साकारली होती. विंदू दारा सिंह हे दारा सिंह यांचे पुत्र आहेत. विंदू यांनी मुस्लिम मुलीशी लग्न करु नये म्हणून दारा सिंह यांनी विरोध केला होता.

मुलाने मुस्लिम मुलीशी लग्न करू नये म्हणून... अभिनेत्याने दिली होती थेट वॉर्निंग
Vindu Dara SinghImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 7:30 AM
Share

रामानंद सागर यांच्या रामायणामध्ये हनुमानाची भूमिका साकारून सर्वांचे मन जिंकणारे अभिनेते म्हणजे दारा सिंह. त्याकाळी दारा सिंह यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. त्यांचा मुलगा विंदू दारा सिंह यांनी मुस्लिम मुलीशी लग्न केले. पण विंदू यांचा याला विरोध होता. विंदू यांनी स्वतः याबाबत सांगितले होते. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केले होते की ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते, पण त्यांनी विंदू दारा सिंह यांना एक वॉर्निंग अवश्य दिली होती.

विंदूने मुस्लिम मुलीशी लग्न करू नये असे का वाटत होते?

विंदू यांनी स्वतः आपल्या वडील दारा यांच्याबाबत सांगितले होते, “आम्ही तसे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांना भाऊ मानणारे आहोत. माझे वडील नेहमी म्हणायचे. ते म्हणायचे की विंदू, हिंदू-मुस्लिम लग्न खूप कठीण असते. विंदू यांनी सांगितले की दारा सिंह त्यांना फराहशी लग्न करण्याच्या निर्णयाबाबत वारंवार विचार करायला सांगत होते. जेव्हा मी त्यांना सांगितले की मी फराहशी लग्न करू इच्छितो, तेव्हा त्यांनी म्हटले की हे खूप कठीण होईल विंदू. शेवटी गोष्टी चुकीच्या होतात. मी त्यांना म्हटले पापा काहीही चुकीचे होणार नाही. त्यांनी म्हटले पुन्हा विचार कर.”

वडिलांचा सल्ला योग्य होता

विंदू यांनी पुन्हा सांगितले की वडिल दारा सिंह यांचा सल्ला अगदी योग्य होता. आज जेव्हा मी मागे बघतो तेव्हा वाटते की ते बरोबर होते. मात्र त्यांना आपल्या निर्णयाबाबत कोणताच पश्चात्ताप नाही. “मला आपल्या निर्णयाबाबत पश्चात्ताप नाही कारण मला त्यातून फतेह मिळाला, एक अप्रतिम मुलगा ज्याला मी माझ्या आयुष्यापेक्षाही जास्त प्रेम करतो” असे विंदू म्हणाले.

मात्र विंदू यांनी पुढे सांगितले की नेहमी हे लक्षात ठेवा की पालकांचा सल्ला नेहमी ऐकायला हवा. ते म्हणाले, “आम्ही पालकांचे ऐकत नाही. आम्हाला वाटते की त्यांना काहीही माहित नाही. पण त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. ते भगवान आहेत.”

विंदूचे लग्न वेगवेगळ्या धर्मामुळे तुटले का?

जेव्हा त्यांना विचारले गेले की फराहशी लग्न तुटण्याचे कारण धर्म होता का, तेव्हा त्यांनी सांगितले की होय पूर्णपणे. त्यांनी म्हटले, “धर्म आमच्यासाठी सुरुवातीला अगदी सामान्य होता, पण नंतर त्या धार्मिक झाल्या. जर कोणी एक जास्त धार्मिक झाला तर गुंतागुंत निर्माण होते.” तसेच फराहशी घटस्फोटानंतर विंदू यांनी रशियन मॉडेल दीना उमारोवाशी पुन्हा लग्न केले. दोघांची एक मुलगीही आहे. दोघांचे हे लग्न चांगले चालले आहे आणि ते एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर