AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Facts: जंगलातील हे झाडं अंगणात लावल्यास साप काढतात पळ, आदिवासी का ठेवतात बी जवळ?

Snake Facts : जंगलातील हे झाडं औषधांचा खजिनाच आहे. आदिवासी या झाडाला खूप मानतात. त्यांच्या आयुष्यात हे झाड कल्पवृक्षासारखंच आहे. पण या वृक्षाचे बी, पान जवळ बाळगल्यास खरंच साप जवळ फिरकत नाही का?

Snake Facts: जंगलातील हे झाडं अंगणात लावल्यास साप काढतात पळ, आदिवासी का ठेवतात बी जवळ?
या झाडामुळे साप येत नाही जवळ?
| Updated on: Oct 02, 2026 | 1:51 PM
Share

Tendupatta Tree Snake: भारताचा आदिवासी पट्टा हा निसर्गसंपदेने समृद्ध आहे. जंगलातील अनेक वृक्षांची माहिती आदिवासींना असते. त्यांचे औषधी गुणधर्म त्यांना माहिती असतो. आदिवासींचे भुमका, परिहार, वैदू यांना या वृक्षांबद्दल सखोल माहिती असते. तर काही किवंदती असतात. काही गैरसमज पिढ्यानुपिढ्या चालत आलेले असतात. तेंदू पत्ता हा केवळ विडीसाठी वापरला जातो असे नाही तर हे झाड बहुगुणी मानले जाते. या झाडाची फळं, मूळं, पानं हे औषधी गुणधर्मासाठी ओळखले जातात. पण हे झाड अंगणात असले अथवा तेंदूचे बी जरी कमरेला बांधलेले असले तरी साप जवळ फिरकत नाही असा आदिवासींचा समज आहे. काय आहे त्यामागील सत्य?

आदिवासी लोकांची मान्यता काय?

देशातील अनेक भागात तेंदू पत्ता आढळतो. राज्यात गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथील जंगल पट्ट्यात तेंदू उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. विडी वळवण्यासाठी या पानाचा उपयोग होतो. तसा इतरही अनेक साहित्य आणि औषधी गुणधर्मासाठी हे झाडं ओळखलं जाते. जुन्या लोकांच्या मते तेंदूच्या पानांचा आणि वनस्पतीला एक उग्र वास येतो. या झाडाच्या जवळपासही साप फिरकत नाही. साप हा जिभेच्या मदतीने वातावरणातील गंधाचा अंदाज घेतो. तेंदू झाडाचा आणि पानाचा गंध इतका तीव्र असतो की साप हा गंध सहन करू शकत नाही. त्यामुळे ज्या भागात हा वृक्ष असतो, तिकडे हा साप फिरकत नाही. त्यामुळे आदिवासी गावाच्या जवळपास तेंदू झाड हमखास आढळते. हे झाड अंगणातही असते. शेतात, बंधाऱ्याच्या कडेलाही हे झाड लावण्यात येते.

वैज्ञानिक दृष्टीकोन काय?

वैज्ञानिक आणि सर्पतज्ज्ञ मात्र या दाव्याशी सहमत नाहीत. त्यांच्या मते सापाचे मुख्य लक्ष हे भक्ष असते. साप हे उंदराची बिळे, लाकडाचे ढीग आणि ओलसर ठिकाणी जास्त जातात. योग्य तापमान असेल तिथे साप आश्रय घेतात. तेंदूच्या झाडाचा वासाने साप विचलित होण्याची शक्यता आहे. पण साप या झाडामुळे येत नाही हा दावा सिद्ध झालेला नाही. हा वैज्ञानिक सत्यापेक्षा पारंपारिक लोककथेचा एक भाग आहे.

साप चावल्यानंतर हे पदार्थ टाळाच

दारू

चहा अथवा कॉफी पिणे

एनर्जी ड्रिंक

आयुर्वेदिक काढा

तंबाखू खाणे,

धूम्रपान करणे

दूध पिणे

तूप, मध, वा इतर घरगुती उपाय

गोमूत्र अर्क देणे

Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद