AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Facts: विषारी दात गमावल्यावर साप जगतो कसा? अन्नाविना जिवंत राहतो कसा?

Snake Venom Fangs: एकदा शिकार केल्यावर साप अनेक आठवडे काही न खाता राहू शकतो. सापाचा प्रकार, आकार आणि त्याचे तापमान याच्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. जर एखाद्यावेळी त्याचे विषारी दात तुटले तर नवीन दात येईपर्यंत तो कसा जिवंत राहू शकतो?

Snake Facts: विषारी दात गमावल्यावर साप जगतो कसा? अन्नाविना जिवंत राहतो कसा?
विषारी सापाचे दात
| Updated on: Sep 27, 2026 | 1:36 PM
Share

Snake Venom Teeth: एक प्रश्न नेहमी लोकांच्या मनात येतो की, एकदा जेवण केल्यावर साप किती दिवस काहीही खाता न पिता जिवंत राहू शकतो. त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी सापाच्या दातांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. विषारी सापांचे दात हे इतर दातांपेक्षा वेगळे असतात. सापाचे तोंड बंद झाल्यावर हे दात जबड्याच्या आत जातात. तर साप जेव्हा तोंड उघडतो, तेव्हा हे दात समोर येतात. याच विषारी दातांमुळे शरीरातील विष हे बाहेर येते. शिकार पचवण्यासाठी आणि धोका वाटल्यास हल्ला करण्यासाठी साप या दातांचा उपयोग करतो.

विषारी दात तुटल्यावर होते काय?

तज्ज्ञांच्या मते, शिकार करताना अथवा एखादा फटका बसल्यास सापाचे विषारी दात तुटतात. ते क्षतिग्रस्त होतात. अर्थात निसर्गाच्या वरदानामुळे हा तुटलेला दात पुन्हा उगू शकतो. सापाच्या अनेक प्रजाती आहेत. त्यांच्यात दात पुन्हा येतात. अनेक सापांच्या प्रजातीत नवीन दात येण्याची प्रक्रिया सातत सुरू असते. त्यामुळे दात तुटल्यानंतर साप कायमचा शिकार करण्यास असमर्थ ठरत नाही. काही दिवसानंतर दात येतात.

शिकार चावत नाही साप

उंदीर, बेडूक अथवा इतर शिकार साप हा चावून खात नाही. तो शिकार पूर्णपणे गिळून टाकतो. सापाचा जबडा आणि शरीर लवचिक असते. त्यामुळे जबडा मोठा करून तो शिकार गिळून टाकतो. त्यानंतर शरीरात शिकार पचनाची प्रक्रिया सुरू होते. शिकाराच्या आकारानुसार, ती पचनासाठी खूप वेळ लागतो.

अनेक दिवस नाही लागत भूक

एकदा शिकार केल्यावर साप अनेक दिवस अथवा आठवड्यापर्यंत शिकार करत नाही. तो काहीही न खाता जिवंत राहतो. काही परिस्थितीत तर तो कित्येक दिवस काहीही न खाता जिवंत राहतो. अर्थात सापाची प्रजाती कोणती, त्याचे शरीर, आकार आणि तापमानावर तो किती दिवस काहीही न खाता जिवंत राहतो, हे अवलंबून असते. काही तज्ज्ञांच्या मते, काही प्रजातीचे साप काहीही न खाता तीन महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकतात. तोपर्यंत शरीरातील कार्बोदकं आणि ऊर्जा यातून तो गरज भागवतो.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...