AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EVM मशीनचे ते सीक्रेट बटण, केवळ निवडणूक अधिकारीच करू शकतात Press

EVM Button: ईव्हीएम मशीनमध्ये एक असे सीक्रेट बटण असते जे केवळ निवडणूक अधिकारीच दाबू शकतात. या बटणाचा काय असतो उपयोग? ईव्हीएममध्ये ते का इतके खास? मतदारांसाठी त्याचे इतके महत्त्व का? जाणून घ्या

EVM मशीनचे ते सीक्रेट बटण, केवळ निवडणूक अधिकारीच करू शकतात Press
ईव्हीएम बॅलेट बटण
| Updated on: Sep 26, 2026 | 2:50 PM
Share

EVM Ballot Button: इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये गडबड होऊ नये यासाठी अनेक तांत्रिक बाबी लक्षात घेतल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात येतो. मतदाराचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा आणि बोगस मतदार घुसू नये यासाठी अनेक स्तराची सुरक्षा व्यवस्था आयोग घेतो. त्यासाठी ईव्हीएम मशीनमध्ये एक सीक्रेट बटण असते. त्याला बॅलेट बटण असे म्हणतात. हे बटण कंट्रोल युनिटवर असते. अधिकृत पोलिंग अधिकारी ते व्यवस्थापन आणि नियंत्रण करतो. मतदार हा त्याच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी निळे बटण दाबतो, पण जोपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होत नाही, अधिकारी ते मशीन सुरू करत नाही. ही प्रक्रिया पूर्ण होत नाही.

बेल्ट बटण कुठे असते?

बेल्ट बटण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीच्या कंट्रोल युनिटवर असते. हे बटण पोलिंग अधिकाऱ्यांच्या व्यवस्थापना खाली असते. कंट्रोल युनिटला बॅलेट युनिटपासून वेगळे ठेवण्यात येते. याठिकाणी मतदार उमदेवाराला मतदान करतात. कंट्रोल युनिट हाताळणारा अधिकारी मतदाराची ओळख पटवल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करतो. यादरम्यान बॅलेट युनिट मतदान बॉक्समध्ये ठेवण्यात येते. यामुळे मतदान करताना गोपनीयता बाळगली जाते.

बॅलेट बटण कसे काम करते?

मतदान प्रक्रियेत अनेक टप्पे असतात. मतदाराच्या ओळखीपासून ते मतदान होईपर्यंत अनेक टप्पे असतात. जेव्हा मतदार मतदान केंद्रावर येतो. तेव्हा केंद्रावरील मतदान अधिकारी, मतदाराची ओळख पटवतो. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करतो. मतदानावेळी बोटावर शाई सुद्धा लावली जाते. यामुळे बोगस मतदारांना आळा बसतो. मतदाराची ओळख पटल्यानंतर अधिकारी कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटण दाबतो. बॅलेट युनिट सुरू होते. यामुळे मतदानाचा मत नोंदवल्या जाते.

बॅलेट बटण दबाल्यानंतर कंट्रोल युनिटसंबंधित स्टेट्‍स इंडिकेशन दिसते. यासह बॅलेट युनिटवर हिरवा आणि लाल रंगाचा लाईट लागतो. यानंतर मतदार संबंधित निळे बटण दाबून मतदानाचा हक्क बजावता येतो. बॅलेट बटण दाबल्यानंतर कंट्रोल युनिटशी संबंधित स्टेट्‍स इंडिकेशन दिसते. त्यासोबतच बॅलेट युनिटवर हिरवा-लाल रंगाचा लाईट लागतो. मतदाराने निळे बटण दाबल्यावर ईव्हीएममधून एक दीर्घ बीप असा आवाज येतो. त्याआधारे मतदान झाल्याचे पक्के होते.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन