AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satej Patil : गोकुळमध्ये सत्ता गेली, सतेज पाटलांची दोन शब्दांत ‘नवी टॅगलाईन’, महायुतीला कडक इशारा

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे राजेश पाटील विजयी झाले. यानंतर सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेसाठी लावलेल्या बॅनरवरील मजकुराने लक्ष वेधलं आहे. 'महायुतीने कोल्हापूरचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला... लक्षात ठेवलंय' असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

Satej Patil : गोकुळमध्ये सत्ता गेली, सतेज पाटलांची दोन शब्दांत 'नवी टॅगलाईन', महायुतीला कडक इशारा
सतेज पाटील Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 10, 2026 | 4:51 PM
Share

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, त्यांनी समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत चुयेकर यांचा पराभव केला. या निकालानंतर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचे पडसाद आता कोल्हापुरात उमटू लागले आहेत.

सतेज पाटलांच्या पत्रकार परिषदेसाठी विशेष बॅनर

गोकुळ दूध संघाची निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे 13 संचालक विजयी झाले होते. तर महायुतीच्या पॅनलला 12 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, महायुतीच्या अपेक्षित संचालकांनी या बैठकीला उपस्थिती लावली नाही. त्यामुळे शशिकांत चुयेकर यांची एकतर्फी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही निवड बेकायदेशीर असल्याचा आक्षेप महायुतीने घेतला. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीचा तिढा निर्माण झाला.

यावर तोडगा निघत नसल्याने राज्य सरकारने शासननियुक्त 5 सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात शासन आदेशही काढण्यात आला. या 5 सदस्यांपैकी 4 सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. सरकारच्या या निर्णयावर सतेज पाटील यांच्या आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. विरोधी पक्षांनीही या आघाडीला पाठिंबा दिला. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशानुसार 10 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे राजेश पाटील विजयी झाले.

दरम्यान, 9 नोव्हेंबर रोजी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात विरोधक एकवटले होते. त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत टीका केली होती. त्यानंतर आज गोकुळची सत्ता महायुतीच्या हातात गेल्यानंतर सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष बॅनर लावले आहे.

सतेज पाटील यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या आसनाच्या मागे हा बॅनर लावण्यात आला आहे. ‘महायुतीने कोल्हापूरचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला… #लक्षात ठेवलंय’ असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. आज सायंकाळी 5 वाजता सतेज पाटील यांची पत्रकार परिषद होणार असून, यावेळी समविचारी आघाडीचे 13 संचालक उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेत सतेज पाटील काय भूमिका मांडतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार