AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Dhangekar: ‘लोक तुम्हाला चौकाचौकात…,’ ‘गोकुळ’च्या विजयानंतर धंगेकरांनी भाजपला डिवचलं!

लोकांना किळस येईल एवढा माज केला नाही पाहिजे," अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरमधील भाषणावरुन खोचक टीका केली आहे.

Ravindra Dhangekar: 'लोक तुम्हाला चौकाचौकात...,' 'गोकुळ'च्या विजयानंतर धंगेकरांनी भाजपला डिवचलं!
| Updated on: Nov 10, 2026 | 4:44 PM
Share

दीपक कापरे, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी:

Ravindra Dhangekar On Chandrakant Patil:  “चंद्रकांत दादांचे भाषण नळावरच्या भांडणासारखं होतं. याव करील ट्याव करील, आमकं करील तमकं करील, सत्ता तुमची  देखील जाणार आहे ले ध्यानात ठेवलं पाहिजे, लोकांना किळस येईल एवढा माज केला नाही पाहिजे,” अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरमधील भाषणावरुन खोचक टीका केली आहे.

काय म्हणाले रविंद्ग धंगेकर?

“एखाद्या कुटुंबाच्या व्यवसायावर जाण्याची चंद्रकांत पाटील यांची जुनी सवय आहे. एक काळ असा येईल की तुम्हाला चौकाचौकात लोक जाब विचारतील. त्यावेळेस उत्तर देताना तुम्हाला नाकीनऊ येईल, केस एका बाजूला राहील,धोतर एका बाजूला राहील, आपला चष्मा एका बाजूला राहील तो काळ लांबचा नाही, जवळचं आहे, अशा पद्धतीची दमदाटी केली नाही पाहिजे,” अशा शब्दात रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवरही हल्लाबोल केला आहे.

तुम्हाला लोक चौकाचौकात… भाजपवर घणाघात! 

तसेच “तुम्ही हॉटेलच्या बाहेर चहा कोण पाजते का वाट बघत उभे राहायचा, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांचे वडील स्कूटरवर फिरायचे. तुम्ही शबनम बॅग घेऊन हॉटेलच्या बाहेर उभे होता ना? चहा कोण पाजते का? महाराष्ट्राने ही परिस्थिती पाहिली आहे. तुम्ही काय किर्लोस्करचे नातू वगैरे होता का? असा सवाल विचारत काँग्रेसमध्ये काय चालते भाजपमध्ये काय चालते हे दादांना सगळं माहित असते. त्यांना विचारल्याशिवाय कुणी काही करत नाही सोनिया गांधी यांनी सुद्धा सांगितलं असेल त्यांनी मला अशी धमकी दिली होती,” असा खोचक टोलाही रविंद्र धंगेकर यांनी लगावला.

दोन्ही ठाकरे एकत्र येणार? 

यावेळी बोलताना रविंद्र धंगेकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबतही सर्वात मोठे अन् महत्त्वाचे विधान केले आहे. “मराठी माणसं एकत्र आली तर आनंद आहे, आणि ती आलीच पाहिजेत मराठी माणसाच्या दृष्टीने हे महत्त्वाचा आहे हे सर्वांचे मत आहे. राजकारणात मुफ्ती सय्यद आणि भाजपची होऊ शकते तर ही का नाही? एक वडिलांचा वारस आणि एक विचारांचा वारस आहे. त्यांच्यात जास्त अंतर नाही, जवळचे अंतर आहे अन् हे होऊन जाईल,” असं म्हणत रविंद्र धंगेकर यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे येण्याबाबतही मोठं विधान केले आहे.

Follow Us
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!