AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे कुणालाच नाही जमलं ते ज्ञानेश कुमार यांच्यामुळं साधलं… दोन कट्टर विरोधक आले एकत्र, डाव्यांकडून ममता दीदींना फोन का?

Left Party-Mamata Banerjee : एका निवडणूक आयोगामुळे देशात महाभारत आणि रामायण घडेल असे कधी कुणालाच वाटले नाही. देशात राजकीय परिमाण आणि परिणाम दोन्ही झपाट्याने बदलत आहे. ज्ञानेश कुमार यांच्यामुळे दोन कट्टर विरोधक पहिल्यांदाच बोलल्याचा दावा करण्यात येत आहे. काय आहे मोठी अपडेट?

जे कुणालाच नाही जमलं ते ज्ञानेश कुमार यांच्यामुळं साधलं... दोन कट्टर विरोधक आले एकत्र, डाव्यांकडून ममता दीदींना फोन का?
एमए बेबी, ममता बॅनर्जी, ज्ञानेश कुमार
| Updated on: Sep 26, 2026 | 10:56 AM
Share

एक निवडणूक आयोग काय करू शकतो? असा सवाल विचारला तर निष्पक्ष निवडणुका घेऊ शकतो, मतदारांचे अधिकार अबाधित ठेवू शकतो असे आतापर्यंत म्हटले जायाचं. पण दोन्ही कट्टर राजकीय विरोधकांना एकत्र आणण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्तांनी केलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे नवल घडलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची कार्यशैली आणि विशेष मतदार यादी पुनरावृत्तीवरून (SIR) राजकीय विरोधक एकत्र येत असल्याचे समोर आले आहे. राजकीय विरोधक तृणमूल काँग्रेस (TMC) आणि डावे पक्षात (Left Party) संवादाचा पूल दिसून आला.

डाव्यांचा स्पेशल कॉल

द इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी आणि सीपीआय(एम) चे महासचिव एमए बेबी यांच्यात शुक्रवारी फोनवरून चर्चा झाली. दोन्ही विरोधी गोटातील पक्षांमध्ये निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सूर जुळले. लवकरच ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोहिम छेडण्यात येणार आहे. त्यात तृणमूल काँग्रेससोबत डावे दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती समोर आली नाही. तर ममता दीदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यातही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच इंडिया आघाडीची बैठक होण्याची दाट शक्यता आहे.

डाव्यांचे बिगर भाजप पक्षांना आवाहन

तर दोन दिवसांपूर्वी सीपीआय (एम) महासचिवांनी ममता दीदी आणि इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांना तसेच इतर पक्षांना पत्र पाठवले आहे. देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा हाकारा देत आंदोलन करण्यासाठी एकत्र येण्याची गळ या पत्रात घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे ममता दीदींनी या पत्रालाही उत्तर दिले आहे. त्यांनी डाव्यांची बाजू उचलून धरली आहे. सध्याची परिस्थिती बिकट असून भाजपविरोधी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकशाही वाचवण्यासाठी नवीन मोट

भाजपाने अनेक घटनात्मक संस्था बाटवल्याचा आणि तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माणसं पेरल्याचा आरोप राहुल गांधींसह विरोधक करत आहेत. या संस्था वाचवण्यासाठी आता विरोधी पक्षांची पुन्हा मोट बांधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्ञानेश कुमार यांचा आयता मुद्दा हाती आल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये एकीचे वारे वाहत आहे. यामुळे देशात नवीन राजकीय समीकरणं समोर येण्याची शक्यता आहे. देशाच्या राजकीय पटलावर मोठ्या उलथापालथीचे संकेत या घडामोडीतून मिळत आहेत.

Follow Us
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर