AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगावरून NDA मध्ये मतभेद? भाजपच्या 3 मित्रपक्षांचे ज्ञानेश कुमारांविरोधात मोठे पाऊल

Election Commission-NDA: केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. त्याचवेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांनी सुद्धा वेगळा सूर आळवला आहे. तीन मित्रपक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात हाकारा पिटला आहे.

निवडणूक आयोगावरून NDA मध्ये मतभेद? भाजपच्या 3 मित्रपक्षांचे ज्ञानेश कुमारांविरोधात मोठे पाऊल
भाजपच्या 3 मित्रपक्षांची नाराजीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 26, 2026 | 8:13 AM
Share

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरून देशात वादळ उठले आहे. द इंडियन एक्सप्रेसने केलेल्या दाव्यानुसार, दोन आयुक्तांनी त्यांच्याविरोधात केंद्राकडे नाराजी व्यक्त केली आहे. तर SIR, मतदार याद्यावरून विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दंड थोपाटले आहे. कायदेशीर मार्गही अवलंबिल्या जात आहे. तर त्याचवेळी आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनही विरोधी पडघम वाजू लागले आहेत. NDA मधील तीन घटक पक्षांनी वेगळा सूर आळवला आहे. त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एनडीएमधील मित्रपक्षांनी निवडणूक आयुक्तांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त गप्प का?

मतदार याद्यांमध्ये फेरफार आणि इतर कथित आरोपांमुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार हटाव अशी घोषणा बाजू सुरू केली आहे. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीने 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. या सर्व गदारोळात भाजपचे प्रमुख नेतृत्वाने समोर येऊन कोणतीही टिप्पणी केलेली नाही. त्यांचे प्रवक्ते बाजू मांडत आहेत.

तर दुसरीकडे लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी निवडणूक आयोगाला प्रकरणात स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. जनतेचा निवडणूक प्रणालीवरून विश्वास उठला तर तो लोकशाहीसाठी घातक ठरेल. यामुळे ज्या काही शंका आणि आरोप होत आहे, त्याचे निरसन आयोगाने करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तर बिहारमधील भाजपचा मित्र पक्ष राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख आणि खासदार उपेंद्र कुशवाहा यांनी आयोगाला या वादावरून चांगलेच धारेवर धरले.

जनतेमध्ये निवडणूक आयोगाविषयी मोठी नाराजी

उपेंद्र कुशवाहा यांच्या मते, मतदार यादी पुनरावृ्त्ती, उजळणी (SIR) मुद्यावरून जनतेमध्ये मोठी नाराजी आहे. मोठा संभ्रम सुद्धा आहे. आपल्याच देशातील लोकांना त्यांच्या आजी-आजोबांची माहिती का विचारली जात आहे, याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे. आयोगाने तातडीने याविषयीच्या प्रश्नांची, आरोपांची वस्तुस्थिती लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. पण आयोगाकडून कोणताही खुलासा झाला नसल्याने त्यांनी तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी आता एनडीएमधील घटक पक्ष करत आहे.

Follow Us
1. शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ...
1. शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?