AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke: ‘ज्ञानेश कुमार यांनी भाजप नेत्यांनाही हरवले!’ अभिजीत दिपके यांचा गौप्यस्फोट

Abhijeet Dipke on Gyanesh Kumar: गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगासह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Abhijeet Dipke: 'ज्ञानेश कुमार यांनी भाजप नेत्यांनाही हरवले!' अभिजीत दिपके यांचा गौप्यस्फोट
अभिजीत दिपके, ज्ञानेश कुमार
| Updated on: Sep 25, 2026 | 9:00 AM
Share

केंद्रीय निवडणूक आयोग आणि आयुक्त ज्ञानेश कुमार गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. द इंडियन एक्सप्रेसने केलेल्या मतभेदांच्या दाव्यानंतर विरोधकही आयुक्तांवर तुटून पडले आहेत. गेल्या दोन वर्षांतील निवडणुकांचा संदर्भ देत विरोधकांनी आरोपांची राळ उठवली आहे. त्यातच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी एक मोठा बॉम्ब टाकला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या धोरणांचा विरोधकांनाच नाही तर सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनाही मोठा फटका बसल्याचा गौप्यस्फोट दिपके यांनी केला आहे.

भाजपच्या नेत्यानांही त्यांनी हरवले

अभिजीत दिपके हे विद्यार्थी आंदोलनानंतर देशाच्या राजकीय पटलावर ठसठशीतपणे पुढे आले. त्यांनी आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांनी कुमार यांच्या कार्य पद्धतीवर अत्यंत सूचक आणि मोठे खळबळजनक विधान केले आहे. ज्ञानेश कुमार यांच्यामुळे विरोधकांनाच नव्हे तर भाजपच्या नेत्यांनाही निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या विधानाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

जिथे पराभव, तिथे चर्चेला उधाण

“जर फ्री अँड फेअर नसेल तर कोणीही निवडणूक लढवू नका असे माझे मत आहे, भाजपचे नेते जी निवडणूक हारले आहेत, त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की, सर तुम्ही निवडणूक जिंकू शकले असते. पण ज्ञानेश कुमार यांनी तुम्हाला हरवले.” असे वक्तव्य अभिजीत दिपके यांनी केले. भाजप नेत्यांचा काही ठिकाणी पराभव झाला. त्यात काही दिग्गज नेतेही होते. ज्या ज्या ठिकाणी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजप नेते पराभूत झाले आहेत. तिथे आता दिपके यांच्या विधानाने चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाली आहे.

48 तासांचा अल्टिमेटम

अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागितला आहे. त्यासाठी 48 तासांचा कालावधी देण्यात आला आहे. जर या मुदतीत, कालावधीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला नाही तर देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात येणार आहे. आम्ही प्रत्येक राज्यात आंदोलन सुरू करू. लोकांना जागं करू. जंतरमंतरवर आंदोलन सुरू करण्यापूर्वी आम्ही देशभरात गेलो होतो. आताही तसेच होणार असल्याचा इशारा दिपके यांनी दिला.

Follow Us
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा