AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमार यांचा वापर करून… निवडणूक आयुक्तांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल, थेट मोठा आरोप

NCP Jitendra Avhad on Gyanesh Kumar: शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हान यांनी सरकारवर मोठा हल्लाबोल केला आहे. सरकार Gen Z आणि Gen Alpha ला घाबरले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगातील कथित मतभेदांवर त्यांनी सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

ज्ञानेश कुमार यांचा वापर करून... निवडणूक आयुक्तांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल, थेट मोठा आरोप
ज्ञानेश कुमार, शरद पवार
| Updated on: Sep 25, 2026 | 7:43 AM
Share

NCP Jitendra Avhad on Gyanesh Kumar: निवडणूक आयोगाच्या वादादरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ज्ञानेश कुमार यांचा वापर करून देशातील नवीन पिढी आणि तरुणाईला मतदार होण्यापासूनच वंचित करण्याचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार Gen Z आणि Gen Alpha ला घाबरले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगातील कथित मतभेदांवर त्यांनी सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

NCP (SP) नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला रोकडा सवाल केला. सरकार Gen Z ला घाबरली आहे का? हे सरकार Gen Z आणि Gen Alpha ला घाबरेलच. यामुळेच ज्ञानेश कुमार यांना मोहरा करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांचा वापर करून देशातील नवीन पिढीला मतदार होण्यापासून वंचित करण्यात आले. त्यासाठी फॉर्म क्रमांक 6 आणण्यात आला. हा केवळ दोन पानी अर्ज आहे. आजी-अजोबा काय करतात, आई-वडील काय करतात, याच्याशी तुमचे काय देणेघेणे असा सवाल त्यांनी विचारला.

लोकशाहीचा गळा घोटू नका

मी या देशाचा नागरिक आहे. मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की, तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करा. लोकशाहीचा गळा घोटू नका. त्यांनी सुप्रीम कोर्टाने केलेल्या टिप्पणीकडे लक्ष वेधले. पंतप्रधान हे आयुक्तांच्या समितीत आहेत. त्या समितीचा मग काय उपयोग आहे. पंतप्रधान जो निर्णय घेतील. तोच त्यांचे सहकारी घेतील. विरोधी पक्षनेते अशावेळी काय करणार? तीन लोकांची समिती असेल. त्यात एक पंतप्रधान असतील. एक सदस्य नियुक्त करण्यात येईल. एक विरोधी पक्ष नेता असेल. पंतप्रधान आणि नियुक्त केलेली व्यक्ती मिळून दोन-एकने निकाल लागेल. त्यामुळे ज्ञानेश कुमार सारखी माणसं या पदावर असल्याचा आरोप आव्हाडांनी केला.

मतदार यादीचे सर्व्हर इतर कोणी चालवत आहे

यापूर्वीच आम्ही मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाला सांगितले होते की महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मतदार यादीचे सर्व्हर इतर कोणी चालवत आहे. संधू आणि जोशी हे सध्या जो आरोप करत आहे. ही गोष्ट तर आम्ही दोन वर्षांपूर्वीच सांगितली. आमचा पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांचे सर्व्हर आणि इतर डिव्हाईस मॅनेज करण्यात आल्याचा आम्ही आरोप केला होता. निवडणूक आयोग आणि इतर काही लोक मिळून हा प्रकार करत आहेत, असे आम्ही अगोदरपासून म्हणत होतो असे आव्हाड यांनी सांगितले.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा