IAS अधिकाऱ्यांचा बॉस कोण असतो? समजून घ्या संपूर्ण सिस्टम

| Updated on: Apr 16, 2024 | 6:25 PM

यूपीएससी परीक्षा पास होणे सगळ्यांनाच शक्य नसते. काही मोजके लोकंच टॉप करुन पोस्टिंग मिळवतात. जिद्द आणि चिकाटी असेल तरच या परीक्षेत पास होता येते. पण तुम्हाला माहितीये का की आयएएस अधिकारी हे कोणाला रिपोर्ट करतात. कोण असतो त्यांचा बॉस जाणून घ्या.

IAS अधिकाऱ्यांचा बॉस कोण असतो? समजून घ्या संपूर्ण सिस्टम
Follow us on

IAS Officer : आयएएस अधिकारी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. कारण आयएएसचा थाट वेगळाच असतो. याची क्रेझ दरवर्षी अनेक तरुणांना यूपीएससीच्या दारात घेऊन येते. पण सगळ्यानाच यश मिळते असे नाही. कठीण अशा या परीक्षेत जिद्द आण चिकाटी या शिवाय यश मिळू शकत नाही. आयएएस अधिकारी झाल्यावर त्याचा रुबबाच वेगळा असतो. पण तुम्हाला माहितीये का की हे हाय प्रोफाईल अधिकारीही कुणाला तरी सलाम करतात? शेवटी तो अधिकारी कोण आहे ज्याच्यापुढे आयएएस अधिकारी काम करतात?

कॅबिनेट सचिव हे आयएएसचे प्रमुख

केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट सचिव हे आयएएस अधिकाऱ्यांचे सर्वोच्च पद आहे. कॅबिनेट सचिव हे थेट पंतप्रधानांना अहवाल देत असतात. राज्यांमध्ये मुख्य सचिव हे आयएएस अधिकाऱ्यांचे सर्वोच्च पद आहे. आयएएस परीक्षेत सर्वोच्च क्रमांक मिळवणारे उमेदवार त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत या पदापर्यंत पोहोचतात.

UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात देखील आयएएस परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा असल्याचे सांगण्यात आले होते. देशातील इतर परीक्षा जसे आयआयटी, आयआयएम किंवा एनईईटी इत्यादी सारख्या परीक्षा पण यूपीएससी परीक्षेपेक्षा कठीण नाहीत असे नाही, परंतु उमेदवारांच्या संख्येच्या तुलनेत त्या परीक्षांमधील जागांची संख्या चांगली आहे. तर दरवर्षी लाखो तरुणांपैकी काहींनाच यूपीएससीमध्ये यश मिळते. यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आयएएस झालेले आहेत. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर कोणीही आयएएस होऊ शकतो.

प्रशिक्षण महत्वाचे

परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या स्पर्धकांना प्रशिक्षण घ्यावे लागते. जेथे त्यांना प्रशासकीय क्षमता विकसित करण्याचे कौशल्य शिकवले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग पहिली पोस्टिंग एसडीएम म्हणून दिली होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांना मुख्य विकास अधिकारी किंवा एडीएम म्हणून बढती दिली जाते. यानंतर जिल्हा दंडाधिकारी पद मिळते. जिल्हा दंडाधिकारी बनणे हे प्रत्येक आयएएस अधिकाऱ्याचे स्वप्न असते.