Jain Muni Nileshchandra : BMC वर तोच राज्य करणार, जो…जैनमुनी निलेशचंद्र यांचं मोठ वक्तव्य
"केवळ मारवाडी लोकांना अमराठी करून काय करणार? मारवाडी आम्ही हिंदू आहोत. महाराणाप्रताप यांना आम्ही शस्त्र दिले, महाराष्ट्रातील माणसांना पण आम्ही शस्त्र देऊ शकतो"

कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईत कबुतर खाने बंद झाले आहेत. त्या विरोधात जैन समाजाने आंदोलन सुद्धा केलं. आता जैनमुनी निलेशचंद्र यांनी कबूतर वाचवा अभियान सुरु केलं आहे. “जीवदया आणि गोरक्षासाठी माझ्या समाजाला संघटित करण्याचे काम सुरू केलं आहे. आता पुन्हा दादर मध्ये उपोषण करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत आमचा संदेश देण्यासाठी आम्ही शांततेने आंदोलन करणार आहोत. निवडणूक येत असल्याने काही मंत्री दुर्लक्ष करीत आहेत, मात्र आम्ही दुर्लक्ष करणार नाही” असं जैनमुनी निलेशचंद्र म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
मराठी भाषा अभियाना संदर्भातही ते बोलले. “आमच्या प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे फोटो घराघरात लावून मराठी भाषा बोलण्यास ही सांगणार आहोत” असं ते म्हणाले.
मारवाडी आम्ही हिंदू आहोत
“मराठी-अमराठी वाद वाढू नये, आम्ही तर मराठी बोलणार आहोतच. आज बांगलादेशी घुसले, लव्ह जिहाद, धर्मांतर यावर काम करा ना. केवळ मारवाडी लोकांना अमराठी करून काय करणार? मारवाडी आम्ही हिंदू आहोत. महाराणाप्रताप यांना आम्ही शस्त्र दिले, महाराष्ट्रातील माणसांना पण आम्ही शस्त्र देऊ शकतो. महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे आणि तिचा आम्ही सन्मान करणार” असं जैनमुनी निलेशचंद्र म्हणाले.
मंगलप्रभात लोढा यांच्या विषयी बोलू इच्छित नाही
“मी मंगलप्रभात लोढा त्यांच्या विषयी काही बोलणार नाही. मी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो” असं जैनमुनी निलेशचंद्र यांनी सांगितलं.
अमरावती मध्ये प्रत्येक घरात गाय कापली जाते
“मालेगाव मध्ये तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. अमरावती मध्ये प्रत्येक घरात गाय कापली जाते. गो मातेला राज्यमातेचा दर्जा दिला मग हे काय?. कबूतरच्या नावाने जो भाषावाद चालू आहे, कबुतर गो बॅक. आता आमची व्होट बँक कळली आहे, पुढची लढाई आम्ही लढू. Bmc वर तोच राज्य करणार, जो कबूतरला मदत करणार. गोरक्षावर हल्ले झाले, जीनालय आणि शिवालय चालू करावे” असं जैनमुनी निलेशचंद्र म्हणाले.
