श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला माहित असावा हा मंत्र, अन्यथा मागेच राहून जाल

नोकरीला लागल्यानंतर अनेक जण नको तिथे खर्च करतात. त्यानंतर त्यांना लक्षात येते की, आधी ही गोष्ट का केली नाही. त्यामुळेच जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर काही मंत्र तुम्हाला माहित असावेत. गुंतवणूक कशी आणि कुठे करावी हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही श्रीमंत होऊ शकतात.

श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला माहित असावा हा मंत्र, अन्यथा मागेच राहून जाल
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 5:20 PM

तुम्हाला जर भविष्यात स्वत:ला श्रीमंत पाहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. प्रथम गुंतवणूक हाच उत्तम मार्ग आहे. गरज पडते तेव्हा बँक खात्यात असलेले पैसे आपल्याला कामी येतात. पण जर तुम्हाला भविष्यात चांगली संपत्ती निर्माण करायची असेल तर ती नुसती अकाऊंटमध्ये पैसे जमा करुन होणार नाही. तुम्हाला झपाट्याने वाढणारी महागाई मागे टाकू शकते. तुमची सर्व बचत कधी ती खाऊन टाकेल हे कळणार देखील नाही. त्यामुळेच तुम्ही श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असाल तर त्यासाठी काही मंत्र लक्षात ठेवला पाहिजे.

चक्रवाढ व्याजाचा जिथे लाभ मिळेल आणि परतावा महागाईवर मात करेल अशा ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक केली पाहिजे. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन म्हणाले होते की ‘कम्पाउंडिंग हे जगातील आठवे आश्चर्य आहे. ज्यांना ते समजते ते भरपूर कमवतात आणि ज्यांना नाही ते पैसे गमवतात.’ पण गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी माहित असाव्यात जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल.

20 टक्के गुंतवणूक करा

अनेक अर्थतज्ज्ञ सांगतात की, तुम्ही जे काही कमावता, त्यातील किमान 20 टक्के रक्कम बचत केली पाहिजे आणि गुंतवणूक केली पाहिजे. तुम्ही जर 10,000 रुपये कमवत असाल तर तुम्हाला 2,000 रुपये गुंतवले पाहिजे. जसजशी तुमची कमाई वाढत जाईल, तसतशी गुंतवणुकीची रक्कम 20 टक्क्यांनी वाढवत रहा. गुंतवणुकीचा देखील एक नियम आहे. जितक्या लवकर गुंतवणूक तितके जास्त पैसे.

गुंतवणूक करताना लोकं एक चुक करतात ती म्हणजे सगळे पैसे एकाच ठिकाणी गुंतवणूक करतात. तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारच्या योजनांचा समावेश करु शकता. तुमची गरज काय आहे हे लक्षात घेऊन अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना तुम्ही निवडल्या पाहिजे. तुम्हाला जर ते कळत नसेल तर तुम्ही एखाद्या तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता.

परवडेल तेवढीच जोखीम घ्या

वॉरन बफे यांनी सांगितले आहे की, तुम्हाला परवडेल तेवढीच जोखीम तुम्ही घेतली पाहिजे. इतरांना पाहून कोणतेही निर्णय घेऊ नका. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. तुमचे उत्पन्न किती यानुसार तुमची गुंतवणूक ठरते. तुमचे ध्येय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे त्यानुसारच गुंतवणूक केली पाहिजे. शिस्तबद्ध गुंतवणूक आवश्यक आहे.

आपत्कालीन निधी हा तुमच्या सहा महिन्यांच्या पगाराइतका असावा. जर तुम्ही इमर्जन्सी फंड आधीच जमा ठेवलात, तर कठीण काळात तुम्ही तुमच्या भविष्यासाठी तयार करत असलेला निधी वापरावा लागणार नाही. याशिवाय आरोग्य विमा, जीवन विमा यांसारख्या योजना तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षा कवच देतात.

Non Stop LIVE Update
कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला पण तरीही..
कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला पण तरीही...
मुस्लिम समाजाचा कल विधानसभेलाही मविआकडेच? सर्व्हेतून काय आलं समोर?
मुस्लिम समाजाचा कल विधानसभेलाही मविआकडेच? सर्व्हेतून काय आलं समोर?.
मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?.
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य.
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू.
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया.
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द.
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्...
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्....
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?.
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?.