AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोलीतील नक्षलींचं पत्र टीव्ही 9 च्या हाती

बिजापूर: छत्तीसगडमधील बिजापूर इथं सुरक्षा रक्षकांनी मोठी मोहीम फते केली. जवानांनी तब्बल 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. स्पेशल टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव दलाने मिळून ही कारवाई केली. सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये अनेक तास ही चकमक सुरु होती. नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास भैरामगड ठाणे परिसरातील जंगलात […]

छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोलीतील नक्षलींचं पत्र टीव्ही 9 च्या हाती
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

बिजापूर: छत्तीसगडमधील बिजापूर इथं सुरक्षा रक्षकांनी मोठी मोहीम फते केली. जवानांनी तब्बल 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. स्पेशल टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव दलाने मिळून ही कारवाई केली. सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये अनेक तास ही चकमक सुरु होती. नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास भैरामगड ठाणे परिसरातील जंगलात स्पेशल टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव दलाने मोहीम करुन, 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यांच्याकडून 11 हत्यारं जप्त केली आहेत. या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यापूर्वी छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षारक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता.

गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या अबूझमाड जंगलात छत्तीसगडमधील एसटीएफ आणि डी आर जी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड अबूझमाड इथं सात तास ही शोधमोहीम चालली. त्यावेळी परत येताना पोलिसांना एक गुप्त महिती मिळाली की याच भागातील डोंगराखाली 40 ते 50 नक्षलवादी वास्तव्यास आहेत. याची महिती मिळताच एसटीएफ आणि डीआरजी पोलिसांनी हल्ला केला. यात आधी चार नक्षलवादी ठार झाले. त्यानंतर अडीच तास चकमक झाली यामध्ये एकूण दहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं.

छतीसगड पोलिसांनी अजूनही या जंगलात शोधमोहीम सुरुच ठेवली आहे. या ठिकाणावरुन नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. यात काही रायफल आणि बंदुका मिळून 11 शस्त्रांचा समावेश आहे. आज सकाळी सुरु झालेलं ऑपरेशन संध्याकाळपर्यंत सुरुच होतं. त्यामुळे आणखी काही नक्षलवादी पोलिसांच्या निशाणा बनण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीत नक्षलींकडून आदिवासींची हत्या तर दुसरीकडे याच जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करतात. गेल्या पंधरा दिवसात गडचिरोली जिल्ह्यात 8 आदिवासी नागरिकांची हत्या नक्षलवद्यांनी केली आहे. या हत्या सत्रामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज भामरागड तालुक्यातील ताडगाव – वसफुडी जंगलात आनंदराव मडावी नावाच्या व्यक्तीची नक्षलवाद्यांनी खबरऱ्या म्हणून हत्या केली. या हत्येनंतर नक्षलवाद्यांनी एक पत्र जारी केलं. हे पत्र टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलं. अनेकवेळा धमकी देऊनही आंनदराव मडावी पोलिसांना मदत करत होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली, असं या पत्रात म्हटलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...