AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 मिनिटात 40 टक्के चार्जिंग, ओप्पोचा नवीन फोन लाँच

मुंबई : स्मार्टफोन युजर्सला नेहमीच एका समस्येला सामोरं जावं लागतं. ती समस्या म्हणजे लवकर बॅटरी लो होणे. जगभरात 270 कोटी लोक स्मार्टफोनचा वापर करतात. अनेकदा तर बॅटरी लवकर चार्ज होत नाही आणि चार्ज झाल्यास बॅटरी लवकर उतरते. बॅटरी लवकर उतरते म्हणून त्रस्त झालेल्या लोकांसाठी ‘ओप्पो’(Oppo) लवकरच भारतात नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. ‘Oppo R17 Pro’ […]

10 मिनिटात 40 टक्के चार्जिंग, ओप्पोचा नवीन फोन लाँच
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM
Share

मुंबई : स्मार्टफोन युजर्सला नेहमीच एका समस्येला सामोरं जावं लागतं. ती समस्या म्हणजे लवकर बॅटरी लो होणे. जगभरात 270 कोटी लोक स्मार्टफोनचा वापर करतात. अनेकदा तर बॅटरी लवकर चार्ज होत नाही आणि चार्ज झाल्यास बॅटरी लवकर उतरते. बॅटरी लवकर उतरते म्हणून त्रस्त झालेल्या लोकांसाठी ‘ओप्पो’(Oppo) लवकरच भारतात नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. ‘Oppo R17 Pro’ असं या स्मार्टफोनचं नाव आहे. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ 10 मिनिटात तब्बल 40 टक्के चार्जिंग होणार आहे. ओप्पोने अद्याप या स्मार्टफोनची किंमतीची जाहीर केली नाही. भारताआधी चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच झाला असून त्याची चीनमध्ये किंमत 3999 सीएनवाई म्हणजेच जवळपास 40 हजार रुपये इतकी आहे. ‘Oppo R17 Pro’ मध्ये 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले (2340 X 1080  पिक्सेल रिझॉल्युशन) देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आहे. तर या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणार आहे. ओप्पोने ‘Oppo R17 Pro’मध्ये अँड्राईड 8.1 व्हर्जनचा उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये 12 आणि 20 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे. तर 25 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचं सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळात चार्ज होणारी बॅटरी होय. स्मार्टफोनमध्ये 3650 mAh क्षमतेची बॅटरी असून यात VOOC चार्जिंग दिली गेली आहे. यामुळे स्मार्टफोन 10 मिनिटात 40 टक्के इतक्या झपाट्याने चार्जिंग होते. Oppo R17 Pro स्मार्टफोनची वैशिष्ट्ये :

  • 4 इंच, Oppo R17 Pro
  • 8 GB रॅम
  • 128 GB इंटरनल स्टोरेज
  • 1 अॅंड्रॉईड सिस्टीम
  • 12 + 20 रिअर कॅमेरा
  • 25 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • बॅटरी क्षमता 3650mAh
  • स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!