AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, 4 जवान शहीद

रायपूर:  लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी बीएसएफ जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद झाले आहेत. शहीदांमध्ये आंध्र प्रदेशातील पी रामकृष्ण या जवानाचाही समावेश आहे. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत 4 जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले आहेत. बीएसएफचे जवान शोधमोहिमेवर होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी […]

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, 4 जवान शहीद
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

रायपूर:  लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी बीएसएफ जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद झाले आहेत. शहीदांमध्ये आंध्र प्रदेशातील पी रामकृष्ण या जवानाचाही समावेश आहे.

दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत 4 जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले आहेत. बीएसएफचे जवान शोधमोहिमेवर होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. त्यावेळी जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र अचानक हल्ल्यामुळे बीएएफच्या चार जवानांना प्राण गमवावे लागले.

महला परिसरातील बीएसएफ पथक शोधमोहिमेवर गेलं होतं. या पथकात जिल्हा पथकाचे जवानही होते. हे जवान काही अंतरावर होते, त्याचवेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्यावेळी जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं. मात्र गोळीबारानंतर नक्षलवादी तिथून पळून गेले.

दरम्यान, कांकेर लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली