AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या बोगस अ‍ॅमेझॉन कॉल सेंटरचा पर्दाफाश, नवी मुंबईत 7 जणांना बेड्या

बोगस कॉल सेंटर चालवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सात जणांना नवी मुंबई पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या. ही चोरी करण्यासाठी त्यांनी अॅमेझॉनचा कॉल डेटा हॅक केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या बोगस अ‍ॅमेझॉन कॉल सेंटरचा पर्दाफाश, नवी मुंबईत 7 जणांना बेड्या
नवी मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हेगारी प्रकरणी सात जणांना अटक केली.
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 22, 2021 | 6:13 PM
Share

नवी मुंबईः अ‍ॅमेझॉनचे बोगस कॉलसेंटर (Bogus call center) चालवून त्यातून अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या लोकांची बनवेगिरी नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) उघडी पाडली आहे. या बोगस कॉल सेंटरचा आज (22 नोव्हेंबर) पोलिसांनी पर्दाफाश केला असून या गुन्ह्याखाली 7 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 लॅपटॉपसह इतर सायबर गुन्हेगारीसाठीचे (Cyber crime) साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अकाउंट हॅक झाल्याचे सांगत होते चोर

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ऐरोली सेक्टर 20 मधील शिवशंकर हाईट इमारतीत अ‍ॅमेझॉन नावाने हे लोक बोगस कॉल सेंटर चालवत होते. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन केले जात होते. तुमचे अकाउंट हॅक झाल्याचे सांगून ते परत चालू करायचे असेल तर आपल्याला काही रक्कम भरावी लागेल, ती आपल्याला चेकद्वारे परत दिली जाईल, असे आश्वासन दिले जात होते. खातेधारकांनी दिलेली रक्कम हे लोक आपल्या अकाउंटवर वळवून घेत असत. अशा प्रकारे या लोकांना अनेक अमेरिकन नागरिकांना फसवल्याचे चौकशीत मान्य केले आहे.

अ‍ॅमेझॉनचा कॉल डेटा चोरून रचला सायबर चोरीचा कट

विशेष म्हणजे असा प्रकारे चोरी करण्यासाठी या लोकांनी अ‍ॅमेझॉनचा कॉल डेटा हॅक केल्याचे सांगितले आहे. या कारवाईत सात आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींकडून 10 लॅपटॉप, 2 राऊटर, 8 मोबाइल, 4 हेडफोन आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इतर बातम्या-

‘मराठा समाजाची माफी मागा, पुन्हा आरक्षण मिळवून द्या’, प्रवीण दरेकरांचं ठाकरे सरकारला आवाहन

ही कसली दुश्मनी ? 33 एकरातील भात पिकाच्या गंजीला लावली आग, भंडाऱ्यात असे काय झाले?

Follow Us
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान