विश्वास नांगरे पाटलांनी आईला भीक मागायला लावणारी मुलं शोधली!

नाशिक : दोन मुलं चांगल्या पदावर असूनही आई रस्त्यावर भीक मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली होती. अखेर नाशिक पोलिसांनी माणुसकी दाखवत या मातेला तिच्या मुलांच्या हवाली केलंय. दोन्ही निर्दयी मुलांनी या मातेला घरातून बाहेर काढलं होतं. ज्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 61 वर्षीय प्रमिला नाना पवार यांना गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे स्टेशनवर रहावं लागलं. […]

विश्वास नांगरे पाटलांनी आईला भीक मागायला लावणारी मुलं शोधली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

नाशिक : दोन मुलं चांगल्या पदावर असूनही आई रस्त्यावर भीक मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली होती. अखेर नाशिक पोलिसांनी माणुसकी दाखवत या मातेला तिच्या मुलांच्या हवाली केलंय. दोन्ही निर्दयी मुलांनी या मातेला घरातून बाहेर काढलं होतं. ज्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील 61 वर्षीय प्रमिला नाना पवार यांना गेल्या तीन वर्षांपासून रेल्वे स्टेशनवर रहावं लागलं.

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांमुळे या मातेला तिच्या मुलांनी स्वीकारलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांकडून प्रमिला पवार यांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. एक मुलगा फौजदार आणि दुसरा कंडक्टर असून दोघांनाही चांगला पगार आहे, पण सांभाळत नाहीत, असं या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्याप्रमाणे तपास करण्यात आला आणि या मातेला मुलांच्या स्वाधिन केलं.

1995 मध्ये प्रमिला पवार यांचे पती नाना पवार यांचं शिपाई पदावर असताना निधन झालं. यावेळी मुलं 14 आणि 15 वर्षांची होती. पतीच्या निधनानंतर प्रमिला यांनी मुलांना शिकवलं, मोठं केलं. मोठा मुलगा सतिश हा अनुकंपावर वस्तू आणि सेवा कर विभागात नोकरीला लागला. तर दुसरा मुलगा आतिश हा कंडक्टर म्हणून कार्यरत आहे.

प्रमिला यांच्या दोन्ही मुलांचं लग्न झालं असून ते नाशिकमध्ये राहतात. सुना सांभाळ करत नाहीत आणि मुलांनीही वेडं म्हणून घराबाहेर काढल्याचं प्रमिला यांनी व्हिडीओत म्हटलं होतं. प्रमिला यांचा मुलगा वस्तू आणि सेवा कर विभागात निरीक्षक पदावर आहे. नाशिक पोलिसांकडून दोन्ही मुलांचा शोध घेण्यात आला, त्यांचं समुपदेशन केलं आणि आईला अखेर तीन वर्षांच्या वनवासानंतर मुलांच्या स्वाधिन केलं.

दरम्यान, सतिश पवार हे पोलीस विभागात कार्यरत नाहीत, असं स्पष्टीकरणही नाशिक पोलिसांनी दिलंय.

VIDEO : प्रमिला पवार यांच्याशी बातचीत

संबंधित बातमी

व्हायरल व्हिडीओने पोलखोल, निर्दयी मुलांनी अखेर तीन वर्षांनी आईला स्वीकारलं 

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.