‘जानी दुश्मन’ फेम अरमान कोहलीला बेड्या

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता अरमान कोहली याला पुन्हा एकदा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईतील जुहू येथील अरमानच्या घरात उत्पादन शुल्क विभागाने रात्री धाड टाकली आणि परदेशी मद्याच्या 41 बाटल्या जप्त केल्या. उत्पादन शुल्क विभागाच्या वांद्रे शाखेने ही धडक कारवाई केली असून, अरमानवर अटकेचीही कारवाई करण्यात आली आहे. अरमानने स्कॉच व्हिस्की आणि रम या परदेशी […]

'जानी दुश्मन' फेम अरमान कोहलीला बेड्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता अरमान कोहली याला पुन्हा एकदा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईतील जुहू येथील अरमानच्या घरात उत्पादन शुल्क विभागाने रात्री धाड टाकली आणि परदेशी मद्याच्या 41 बाटल्या जप्त केल्या. उत्पादन शुल्क विभागाच्या वांद्रे शाखेने ही धडक कारवाई केली असून, अरमानवर अटकेचीही कारवाई करण्यात आली आहे.

अरमानने स्कॉच व्हिस्की आणि रम या परदेशी मद्यांच्या बाटल्या परदेशातून अवैधपणे आणल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार वांद्रे शाखेने धडक कारवाई करत, बाटल्या जप्त केल्या आणि अरमानला अटक केली. मुंबई मद्य प्रतिबंधक कायद्यान्वये अरमानवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली.

याआधाही अरमान कोहली वादात अडकला होता. फॅशन डिझायनर असलेल्या गर्लफ्रेण्डचा शारीरिक छळ केल्याचा आरोपही अरमानवर झाला होता.

कोण आहे अरमान कोहली?

अरमान कोहली हा ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. ‘बदले की आग’ आणि ‘राज तिलक’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून अरमानने सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. हे दोन्ही सिनेमे त्याच्या वडिलांनी म्हणजे राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केले होते.

विरोधी, दुश्मन जमाना, औलाद के दुश्मन, वीर, कहर, जानी दुश्मन यांसारख्या सिनेमात अरमानने काम केले असून, त्यानंतर मधे 12 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमातही तो दिसला होता. 2013 सालच्या बिग बॉसच्या सीझनमध्येही अरमान सहभागी झाला होता.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....