मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच…

Milind Deora on MNS Melava Loksabha Election 2024 : यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळव्याला मिलिंद देवरा उपस्थित होते. यावेळी मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं पाहायला मिळालं. वाचा सविस्तर...

मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच...
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 10:44 PM

दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनसे नेते बाळा नांदगावकर, राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. मिलिंद देवरा यांचे स्वागत करताना मनसैनिकानी मिलिंद देवरा यांना घातला मनसेचा शेला पाहायला मिळाला. मिलिंद देवरा यांनीही शाल निरखून पाहत स्मित हास्य केलंय. मिलिंद देवरा यांनी शाल स्वीकारल्यानंतर मनसैनिकांनी एकच जल्लोष केला.

मिलिंद देवरा म्हणाले…

तुम्ही मला मनसेचा शेला घेतला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मी नुकताच शिवसैनिक झालो आहे आणि तुम्ही मला मनसैनिक पण केलं, असं मिलिंद देवरा म्हणाले. शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा मिलिंद देवरा बोलत होते.

मी स्वतःला मराठी माणूस समजतो. कारण माझ्या आईकडचे आडनाव फणसाळकर आहे. बाळासाहेब ठाकरे माझ्या वडिलांना महाराष्ट्राचा जावई म्हणायचे. राज ठाकरे शब्दाची किंमत समजावतात. मराठी माणसाचा मोठा प्रश्न घर आहे. इकडे दक्षिण मुंबईमध्ये मोठी समस्या आहे. पडक्या बिल्डिंगमध्ये जीव धोक्यात घालून नागरिक त्यात राहत होते. मात्र माझ्या कार्यकाळात गिरणीतून पडक्या जागेत लोकांची राहण्याची सोय केली. तो प्रकल्प आता पूर्ण झाला आहे, असं मिलिंद देवरा म्हणाले.

अरविंद सावंत यांच्यावर निशाणा

बाळा नांदगावकर यांचे काम मी पाहिलंय. त्यांचे अतिशय चांगले काम होते. मला हे सांगताना दुःख होत की अरविंद सावंत यांच्या स्वतःच्या बिल्डिंग ला OC नाहीये. अरविंद सावंत बिल्डिंगमधील लोकांना न्याय देऊ शकत नाहीत तर चाळीतील, भाड्याने राहणाऱ्या लोकांच्या समस्या काय सोडविणार?, असं म्हणत मिलिंद देवरा यांनी अरविंद सावंत यांच्यावर टीका केली आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.