श्रीपाद छिंदमचा भाऊही अडचणीत

श्रीपाद छिंदमचा भाऊही अडचणीत

अहमदनगर : वादग्रस्त छिंदमचा भाऊ श्रीकांतने कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप विरोधी भाजप उमेदवाराने केला आहे. त्या प्रकरणी श्रीकांत छिंदम विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्रीकांत छिंदम हा अहमदनगर महापालिकेचा माजी उप महापौर श्रीपाद छिंदम याचा भाऊ आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या वादातून श्रीकांतने भाजप उमेदवार प्रदिप परदेशी यांच्या कार्यालयावर हल्ला चढवल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात देण्यात आली. प्रदिप परदेशी यांचे वडील अमरसिंग परदेशी यांनी ही तक्रार दोखल केली. श्रीकांत छिंदम याने जमावासह घर आणि कार्यालयात जाऊन सामानाची नासधूस केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

यानंतर प्रकरणानंतर प्रदिप परदेशी यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

भाजपाचा माजी उप महापौर श्रीपाद छिंदम आणि त्याची पत्नी अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणूकिच्या रिंगणात आहेत. छिंदम प्रभाग क्रमांक 9 मधून तर पत्नी 13 मधून निवडणूक लढत आहेत. ते दोघेही निवडून यावे यासाठी आज सकाळी मतदान सुरु होण्याआधी छिंदम आणि भाऊ श्रीकांतने मतदान केंद्रावर जाऊन ब्राह्मणाच्या हातून ईव्हीएम मशीनची पूजा केली.

छिंदम याच्यासाठी वाद काही नवा नाही. काही महिन्यांपूर्वी महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना, छिंदमने शिवराय आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच छिंदमला अहमदनगर जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आले होते.

अहमदनगर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अहमदनगरच्या पालिकेसाठी एकूण 68 जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील प्रत्येकी 4 याप्रमाणे 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI