AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगरचे जवान कपील गुंड शहीद

कुणाल जायकर टीव्ही 9 मराठी, अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज गावाचे जवान कपील गुंड हे जम्मू काश्मीर येथे शहीद झाले आहेत. गुरूवारी(15 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटात ते गंभीररित्या जखमी झाले होते. अखेर त्यांना शनिवारी(17 नोव्हेंबर) वीरमरण आले आहे. सोमवारी अजनूज येथे कपील गुंड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उधमपूर येथे झालेल्या स्फोटात कपिल आणि […]

अहमदनगरचे जवान कपील गुंड शहीद
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

कुणाल जायकर टीव्ही 9 मराठी, अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज गावाचे जवान कपील गुंड हे जम्मू काश्मीर येथे शहीद झाले आहेत. गुरूवारी(15 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटात ते गंभीररित्या जखमी झाले होते. अखेर त्यांना शनिवारी(17 नोव्हेंबर) वीरमरण आले आहे. सोमवारी अजनूज येथे कपील गुंड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

उधमपूर येथे झालेल्या स्फोटात कपिल आणि त्यांचा सहकारी जवान गंभीर जखमी झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांना वीरमरण आलं. यावेळी ते 24 वर्षांचे होते.

कपील हे जम्मू काश्मीरच्या ओडी सेक्टर बारा कालापहाड येथे गेल्या चार वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा आहे.

विशेष म्हणजे, शहीद जवान कपील गुंडचे वडील निवृत्त सैनिक आहेत. गुंड यांच्या निधनामुळे संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

कपिल गुंड पार्थिव जम्मू काश्मीर येथून विमानाने पुण्यापर्यंत आणलं जाणार आहे. त्यानंतर लष्करी वाहनातून अजनूज येथे आणले जाणार आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता भीमा नदीकाठी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.