अजित पवार गट की शरद पवार गट? पाहा निलेश लंके कोणत्या पक्षातून लढवणार निवडणूक

अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. या मतदारसंघात आता आणखी चुरस वाढणार आहे. कारण निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. पाहा कोणत्या गटातून ते निवडणूक लढवणार आहेत.

अजित पवार गट की शरद पवार गट? पाहा निलेश लंके कोणत्या पक्षातून लढवणार निवडणूक
nilesh lanke
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 7:50 PM

Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.कारण आमदार निलेश लंके यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते आता लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार गटातून ते उमेदवार असणार आहे. घड्याळ सोडून त्यांनी आता तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत. पण ते अजित पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते. पण आता ते शरद पवार गटात गेले आहेत.

अहमदनगरमध्ये चुरशीची लढाई

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होऊ लागली आहे. अहमदनगरच्या जागेवर त्यामुळे चुरस पाहायला मिळणार आहे. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार निलेश लंके यांच्यात ही आता थेट लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी अहमदनगरमध्ये दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे नीलेश लंके यांच्या पत्नी देखील मतदारसंघात अधिक सक्रिय झाल्या आहेत.

सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे या देखील सक्रिय झाल्या असून महिलांसोबत जनसंपर्क वाढवत आहेत. दुसरीकडे नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या देखील शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

कोण आहेत नीलेश लंके?

निलेश लंके यांचा जन्म 10 मार्च 1980 रोजी पारनेर तालुक्यातील हांगा या छोट्या गावात झाला. त्यांचं कुटुंब सामान्य परिस्थितीत होतं. निलेश लंके यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कमी वयातच त्यांनी हंगा गावात ग्रामपंचायत निवडणुकीत स्वत:चे पॅनल स्थापन करून अकरा जागा जिंकल्या. नीलेश लंके आता शरद पवार गटात सामील झाल्याने अजित पवार गटाचा एक आमदार कमी झाला आहे. याशिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अहमदनगरच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीत आमदार लंके यांनी देखील हजेरी लावली होती. त्यामुळे ते राजीनामा देणार हे जवळपास निश्चित होतं.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.