अमेरिकेत कोरोना संसर्गाचा हाहाकार, 24 तासात सव्वा लाख रुग्णांच्या नोंदीसह ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

| Updated on: Nov 07, 2020 | 5:52 PM

अमेरिकेत एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या नोंदीचा जागतिक विक्रम झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून 24 तासात नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी ही सर्वात मोठी संख्या आहे.

अमेरिकेत कोरोना संसर्गाचा हाहाकार, 24 तासात सव्वा लाख रुग्णांच्या नोंदीसह वर्ल्ड रेकॉर्ड
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) कोरोना संसर्गाने थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. आज (7 नोव्हेंबर) एकाच दिवसात कोरोनाच्या सव्वा लाख नव्या रुग्णांची (Covid-19 Patients) नोंद झाली आहे. यासह अमेरिकेत एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या नोंदीचा जागतिक विक्रम झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून 24 तासात नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी ही सर्वात मोठी संख्या आहे (America more than 1 lakh 25 thousands new cases of Corona in the last 24 hours made world record).

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत शुक्रवारी (6 नोव्हेंबर) देशात 1 लाख 25 हजार 596 नव्या रुग्णांची नोंद झालीय. हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत शुक्रवारी देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच राहिली. सलग तिसऱ्या दिवशी अमेरिकेत 24 तासात 1 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय अमेरिकेत एका दिवसात 1 हजार137 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर अमेरिकेतील एकूण कोरोना मृत्यूचा आकडा 2 लाख 36 हजार 25 वर गेला आहे.

कोरोनाचं सर्वात जास्त नुकसान अमेरिकेत

कोरोनाच्या रुग्णांची आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा विचार केला तर दोन्हीबाबतीत अमेरिका आघाडीवर आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या 13 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. या राज्यांमध्ये कोलोराडो, इलिनोईस, इंडियाना, आयोवा, मॅन, मिनेसोटा, नेब्रास्का, न्यू हॅम्पशायर, नॉर्थ डकोटा, ओहायो, ओक्लाहोमा, यूटा आणि वेस्ट व्हर्जिनियाचा सहभाग आहे. दुसरीकडे 38 राज्यांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णांची नोंद झालीय. कोव्हिड ट्रॅकिंग प्रोजेक्टनुसार, सध्या अमेरिकेत 54,000 पेक्षा अधिक रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. यातील 11,000 आयसीयूमध्ये आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे तज्ज्ञांनी महिनाभराआधीच याबाबत इशारा दिला होता. जूनमध्ये प्रतिदिवशी जवळपास 40 हजार नव्या रुग्णांची नोंद होत होती. तेव्हाच अमेरिकेच्या नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन्स डिसिजचे संचालक अँथोनी फौची म्हणाले होते, “जर अमेरिकेने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अधिक कठोर परिश्रम घेतले नाही, तर 1 लाखापेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद होऊ शकते.”

संबंधित बातम्या :

अमेरिका आणि युरोपातील कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, भारतीयांनी काळजी घ्यावी: नरेंद्र मोदी

हे पहिल्यांदा घडतंय : कोरोनाविषयी अमेरिका चीनची चौकशी करणार, दोषी आढळल्यास नुकसान भरपाईही घेणार

अमेरिकेत ‘कोरोना’चा भस्मासूर,चीनमध्ये एकही बळी नाही, मुंबई-पुणे ते अमेरिका-फ्रान्स, ‘कोरोना’ची बित्तंबातमी

America more than 1 lakh 25 thousands new cases of Corona in the last 24 hours made world record