अमेरिका आणि युरोपातील कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, भारतीयांनी काळजी घ्यावी: नरेंद्र मोदी

अमेरिका आणि युरोपमधील देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी झाली होती. मात्र, आता तिथे वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे भारतीयांनी काळजी घेण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. ( PM Narendra Modi said corona cases increased in America and European nations)

अमेरिका आणि युरोपातील कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, भारतीयांनी काळजी घ्यावी: नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 6:42 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले.यामध्ये कोरोना विषाणू रोखण्यासाठी भारतानं दिलेला लढा, कोरोना वरिल लस, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर याबाबत त्यांनी भाष्य केले. अमेरिका आणि युरोपमधील देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी झाली होती. मात्र, आता तिथे वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे भारतीयांनी काळजी घेण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. (PM Narendra Modi said corona cases increased in America and European nations)

लॉकडाऊन गेले मात्र कोरोना विषाणू गेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे. वारंवार हात धुतला पाहिजे. मास्कचा वापर केला पाहिजे, असे मोदींनी सांगितले. गेल्या 6 ते 7 महिन्यातील भारतीयांच्या प्रयत्नामुळे कोरोना स्थिती सावरली. रिकव्हरी रेट चांगला आहे. लॉकडाऊन गेला पण विषाणू गेला नाही. जगातील विकसित देशांपेक्षा जास्त नागरिकांना वाचवण्यात भारताला यश आले आहे.

भारतामध्ये कोरोनासाठी 90 लाख बेडची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. 12 हजार क्वारंटाइन सेंटर, 2 हजार लॅबमधील टेस्ट सुरू असून लॅबची संख्या 10 हजारांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. सेवा परमोधर्म या सूत्रानुसार डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी, पोलीस यांनी कोरोना विरुद्ध लढा दिला आहे.

गेले काही दिवस कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी निष्काळजी होऊ नका, कोरोना विषाणू गेला, असे मानू नका. निष्काळजीपणा योग्य नाही, मास्क वापरत नसाल तर तुम्ही स्वत:च्या कुटुंबाला संकटात घालत आहात, असे मोदींनी म्हटले.

संत कबीर यांच्या वचनाचा दाखला देत नरेंद्र मोदी यांनी जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत निष्काळजीपणा करु नका. कोरोना वॅक्सिनवर संपूर्ण जगात काम सुरू आहे. भारतातील वैज्ञानिक देखील काम करत आहे. भारतात कोरोना वॅक्सिनवर काम सुरू आहे. काही वॅक्सिन अ‌ॅडव्हान्स स्टेजमध्ये आहेत. वॅक्सिन भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यादृष्टीने काम सुरु आहे, असे मोदींनी म्हटले.

कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी नरेंद्र मोदींनी माध्यमांना आवाहन केले. कोरोना जनजागृतीद्वारे देशाची सेवा करा, असे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोना लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

कोरोनाचं संकट कायम, जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही : पंतप्रधान मोदी

( PM Narendra Modi said corona cases increased in America and European nations)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.