पवारांचा लाव रे तो व्हिडीओ, देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांच्यावर पलटवार
10 वर्षात भाजप सरकारने जनतेसाठी काय केलं हे सांगावं अशी टीका शरद पवार यांनी भाजप सरकारवर केली आहे.
Devendra Fadnavis On Sharad Pawar : सध्या लोकसभा निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. शरद पवार यांनी एका सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिडीओ दाखवले होते. त्यानंतर आता पवार यांनी दाखवलेल्या व्हिडीओवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, शरद पवार यांचे व्हिडीओ दाखवले तर त्यांनी किती कोलांटउड्या घेतल्या ते कळेल अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार हे त्यांच्या लक्षात आलंय असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे फक्त माझ्यावर टीका करतात. 10 वर्षात भाजपने काय केलं ते जनतेला सांगावं असं आव्हान शरद पवार यांनी भाजप नेत्यांना केलं आहे
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर

