IPL 2024 : एकाच गोलंदाजाच्या 18 चेंडूवर 62 धावा, रिषभ पंतचा अनोखा विश्वविक्रम

Rishabh Pant World Record: जगातील कोणत्याही T20 सामन्यात एका गोलंदाजाविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक धावा आहेत. तसेच एका डावात गोलंदाजाविरुद्ध 60+ धावा करण्याची ही पहिलाच घटना आहे.

IPL 2024 : एकाच गोलंदाजाच्या 18 चेंडूवर 62 धावा, रिषभ पंतचा अनोखा विश्वविक्रम
Rishabh Pant
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 9:17 AM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्लसचा कर्णधार ऋषभ पंत याने कमाल केली. नेतृत्वात शुबमन गिल याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सवर 4 धावांनी विजय मिळवला. परंतु स्वत: धमाकेधार खेळी केली. गुजरातसमोर विजयासाठी 225 धावांचे आव्हान ठेवले. परंतु गुजरातला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 220 धावाच करता आल्या. दिल्ली कॅपिट्लसचा संघ या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 8 गुणांवर पोहचला आहे. दिल्लीच्या या विजयात कर्णधार ऋषभ पंत याच्या जोरदार फटकेबाजीचा महत्वाचा वाटा आहे. ऋषभ पंत याने 204.65 या स्ट्राइक रेटने 88 धावा केल्या. त्यात 18 चेंडूवर 62 धावा एकाच गोलंदाजाकडून वसूल केल्या. त्याच्या नावावर हा अनोखा विश्वविक्रम नोंदवला गेला. एकाच गोलंदाजाकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्याच्या यादीत ऋषभ पंत पहिल्या क्रमांकावर पोहचला.

5 चौकार आणि 8 षटकार, 88 धावा

पंत याने गुजरातविरुद्ध 43 चेंडूचा सामना करत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 88 धावांची नाबाद खेळी केली. यामुळे दिल्लीचा संघ 200 पेक्षा जास्त धावा करु शकला. गुजरातविरुद्ध शानदार फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंतने एका गोलंदाजाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केला. त्याने भारतीय वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याच्या 18 चेंडूचा सामना केला. त्यात 62 धावा केल्या. या 62 धावांमध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

जगातील कोणत्याही T20 सामन्यात एका गोलंदाजाविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वाधिक धावा आहेत. तसेच एका डावात गोलंदाजाविरुद्ध 60+ धावा करण्याची ही पहिलाच घटना आहे.

टी20 मध्ये एका गोलंदाजाविरुद्ध सर्वाधिक धावा

खेळाडू गोलंदाज सामन्याचा प्रकार चेंडू धावा
रिषभ पंत मोहित शर्मा आयपीएल 2024 18 62
उस्मान खान कैस अहदम पीएसएल 2023 18 54
कॅमरून डेलपोर्ट टॉम कुरेन टी20 ब्लास्ट 2019 15 53
विराट कोहली उमेश यादव आयपीएल 2013 17 52
हाशिम अमला लसिथ मलिंगा आयपीएल 2017 16 51
Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.