BMC Election 2025 : मुंबईत ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, ‘या’ ठिकाणी शिंदे सेना अन् BJP समसमान जागा लढणार
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांनी समसमान जागा लढवण्याची रणनीती आखली आहे. लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा आणि वरळी यांसारख्या प्रमुख भागांमध्ये दोन्ही पक्ष समान जागांवर उमेदवार उभे करणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुका आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. मुंबईत, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने एक नवी रणनीती आखली आहे. यानुसार, दोन्ही पक्ष मुंबईतील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये समसमान जागा लढवणार आहेत. लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा आणि वरळी यांसारख्या विभागांमध्ये ही समान जागावाटपाची योजना राबवली जाईल. ठाकरे गटासोबत असलेले काही माजी नगरसेवक असले तरी, सर्व जागा शिंदे गटाला सोडल्या जाणार नाहीत; भाजपही काही जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आपले वर्चस्व वाढवण्याच्या उद्देशाने भाजप आणि शिंदे गटात सातत्याने बैठका सुरू आहेत.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?

