हे पहिल्यांदा घडतंय : कोरोनाविषयी अमेरिका चीनची चौकशी करणार, दोषी आढळल्यास नुकसान भरपाईही घेणार

चीनने भारतानंतर आता ऑस्ट्रेलियाला धमकी दिली आहे. अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियानेही चीनमधल्या कोरोनाच्या चौकशीची मागणी केली आहे.

हे पहिल्यांदा घडतंय : कोरोनाविषयी अमेरिका चीनची चौकशी करणार, दोषी आढळल्यास नुकसान भरपाईही घेणार
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 12:27 AM

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला (Things Happening First Time) आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काही देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनचा कालवधीही वाढवला आहे. भारताने देखील 14 एप्रिलला संपणारा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरात (Things Happening First Time) अनेक गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत. त्याचा हा आढावा

1. अमेरिकेने चीनमध्ये कोरोनाची चौकशी सुरु केल्याची माहिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. जर कोरोनाच्या बाबतीत चीन दोषी सिद्ध झाला, तर चीनकडून नुकसान भरपाईसुद्धा वसूल केली जाईल, असंही ट्रम्प म्हणाले. नेमकी किती नुकसानभरपाई घ्यावी, याचा आकडा अद्याप निश्चित झालेला नसल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं.

2. चीनने भारतानंतर आता ऑस्ट्रेलियाला धमकी दिली आहे. अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियानेही चीनमधल्या कोरोनाच्या चौकशीची मागणी केली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची धमकी आता चीनकडून दिली जात आहे. व्यापारासोबत चीनी लोक ऑस्ट्रेलियासोबतचे शैक्षणिक आणि पर्यटनाचे संबंधही तोडतील, असंही चीनच्या राजदुतांनी अप्रत्यक्षपणे सुचवलं.

3. ईस्रायलमध्ये 3 मे पासून टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु होणार आहेत. मात्र, शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगसहित अनेक गोष्टींचं पालन करावं लागणार आहे. कोरोनाच्या फैलावानंतर जे-जे देश लॉकडाऊन झाले होते. त्यात सर्वात आधी चीन आणि त्यानंतर ईस्रायलनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

4. कोरोना व्हायरस पुन्हा परतू शकतो, या भीतीनं चीनमधले स्विमिंग पूल आणि जिमखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी महिन्यापासून स्विमिंग पूल आणि जीमखाने बंद होते. मागच्या आठवड्यापासून ते पुन्हा सुरु करण्यात आले. मात्र, आता पुन्हा ते बंद करण्यात आले आहेत.

5. अमेरिकेत एकट्या न्यूयॉर्कमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 98 हजारांच्या घरात पोहोचला आहे. जगातल्या कोणत्याच शहरात अद्याप इतके कोरोनाबाधित सापडलेले नाहीत. शहरच नव्हे तर एकट्या न्यूयॉर्कमध्ये जितके कोरोनाबाधित आहेत, तितके जगातल्या कोणत्याही देशात सुद्धा नाहीत (Things Happening First Time).

6. कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत अजून एक क्रमांक वर सरकला आहे. आता भारताचा नंबर हा 15 व्या स्थानी आहे. मागचे काही दिवस भारत 16 व्या स्थानी होता. मात्र, काल वाढलेल्याआकड्यानंतर स्वित्झर्लंडला मागे टाकून भारत 15 व्या नंबरवर गेलाय.

7. अर्जेटिना या देशानं थेट 1 सप्टेंबरपर्यंत विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. मार्चपासून अर्जेंटिनाने देशाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. मात्र, कोरोनाचा कोणताही धोका टाळण्यासाठी विमानसेवा थेट सप्टेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आाला. न्यूयॉर्क टाईम्सनं ही बातमी दिली.

8. इराणमध्ये पुन्हा मेथेलॉन प्यायलामुळे 728 लोकांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच इराणमध्ये अशाच घटनेत 600 लोकांचा मृत्यू झाला होता. अंधश्रद्धा आणि मेथेनॉल पिल्यानं कोरोना बरा होतो. या कारणातून अनेक लोक प्रलोभनांना बळी पडत आहेत.

9. भारतानं चीनला दिलेली रॅपिड टेस्ट किटची ऑर्डर रद्द केली आहे. चीनचे रॅपिड टेस्ट किटचे रिपोर्ट संभ्रमकारक आहेत. त्यामुळे भारतानं हा निर्णय घेतला. दरम्यान, भारताच्या या निर्णयानंतर चीननं संताप व्यक्त केला आहे. काही लोकांकडून चीनी उप्तादन हे पूर्वग्रहदूषित नजरेनं पाहिलं जातं, अशी प्रतिक्रिया चीननं व्यक्त केली आहे.

10. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या भारतीय कंपनीकडेही सर्व जगाच्या नजरा लागल्या आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अमेरिकेतल्या कोडाजेनिक्स कंपनीशी टाय अप केलं आहे. या दोन्ही कंपन्या कोरोनावरच्या लसीवर काम करत आहेत. एका माहितीनुसार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतीय कंपनी अंदाजे 165 देशांना वेगवेगळ्या (Things Happening First Time) प्रकारच्या लस पुरवते.

संबंधित बातम्या :

जगात काय घडतंय? : जगातील 30% कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत, रशियात 900 सैनिकांना कोरोना

जगभरात 82 कोटीहून अधिक लोक उपाशी पोटी, कोरोनामुळे घडणाऱ्या ‘या’ 11 घटनांनी जगभरात उलथापालथ

जगात काय घडतंय? : जपानने बागेतील सर्व फुलं तोडली, अफगाणिस्तानात राष्ट्रपतींच्या स्टाफमधील 20 कोरोना पॉझिटिव्ह

इंग्लंडमध्ये कंपन्यांनी सुट्टीवर पाठवलेल्या कर्मचाऱ्यांना सरकार पगार देणार, कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.