AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात….

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानच्या कराची शहरात कोरोनाने मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे (Anil Deshmukh on rumours about Dawood Ibrahim death).

खरंच दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात....
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 06, 2020 | 7:26 PM
Share

चंद्रपूर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानच्या कराची शहरात कोरोनाने मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे (Anil Deshmukh on rumours about Dawood Ibrahim death). अनेकजण याबाबतचे अंदाज वर्तवत आहेत, मात्र सरकारने याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दाऊदच्या मृत्यूबाबत विचारलं असता त्यांनी हसत हसत प्रश्नाला बगल दिली.

अनिल देशमुख यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (6 जून) चंद्रपुरात एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाने कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं (Anil Deshmukh on rumours about Dawood Ibrahim death)

दरम्यान, दाऊदच्या मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणं राज्याच्या गृहमंत्र्यांनी टाळलं. “तुम्ही थेट कराचीत पोहोचलात, आधी चंद्रपूरचं बघूया”, असं अनिल देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख यांनी यावेळी अनेक विषयांवर भाष्य केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने कोरोना निवारणासाठी निधी खर्च न केल्याचा आरोप केला आहे. श्रमिक रेल्वे तिकिटाव्यतिरिक्त राज्य सरकारने कुठला खर्च केला? असा सवाल विचारत या विषयावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यावर अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं. चंद्रकांत पाटील यांच्या मागणीचा विचार करु, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय राज्याने उत्तम कामगिरी केल्याचंदेखील ते म्हणाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील हरसुल कारागृहात लॉकडाऊन असताना कैद्यांना कोरोनाची लागण झाली. याबाबत प्रश्न विचारला असता राज्यातील सर्वच कारागृहात सर्वतोपरी काळजी घेण्यात आली होती. मात्र दूध अथवा भाजीपाला पुरवठा करणाऱ्यांमार्फत कोरोनाची लागण झाली असावी, असा अंदाज त्यांनी वर्तवला.

चंद्रपुरात दारुबंदी लागू आहे. दारुबंदी उठवण्यासाठी स्थानिक स्तरावर पालकमंत्र्यांनी एक समिती गठीत करत अहवाल शासनाला सादर केला आहे. ही दारुबंदी उठविण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी कोरोनाचे सावट दूर झाल्यावर यावर अंतिम निर्णय घेऊ अशी भूमिका व्यक्त केली.

दाऊद इब्राहिम कोण?

गुन्हेगारी विश्वाचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने मुंबई आणि परिसरात अनेक गुन्ह्यांची मालिका उघडली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 64 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे.

दाऊदचा जन्म मुंबईतील डोंगरीचा आहे. तो सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत असल्याचा दावा केला जातो.  भारत आणि अमेरिकेने 2003 मध्ये दाऊदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केले आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांमधील भूमिकेबद्दल त्याच्यावर 25 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके बक्षीस आहे.

दाऊद आपल्या देशात नसल्याचं सांगत पाकिस्तानने अनेक वेळा हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कराचीमध्ये त्याच्यावर उपचार होत असल्याचे वृत्त खरे ठरल्यास पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस येईल. (Dawood Ibrahim positive coronavirus)

संबंधित बातम्या :

Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा कोरोनाने मृत्यू झाल्याची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही!

दाऊद इब्राहिमला ‘कोरोना’, कराचीत लष्करी रुग्णालयात उपचार

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...