AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 लाख बांधकाम मजुरांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार जमा होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने या कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये देण्याचा दिलासादायक मोठा निर्णय घेतला आहे (Announcement for construction labour by Thackeray Government).

12 लाख बांधकाम मजुरांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार जमा होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
| Updated on: Apr 18, 2020 | 4:37 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, लॉकडाऊननंतर रोजंदारीवर पोट असणाऱ्या लाखो मजुरांच्या पोटाचा प्रश्न तयार झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने या कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये देण्याचा दिलासादायक मोठा निर्णय घेतला आहे (Announcement for construction labour by Thackeray Government). स्वतः कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य आणि केंद्र शासनाकडून 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांचा दररोजचा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागवण्यासाठी कामगारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने कामगार मंडळाकडे नोंदणी असलेल्या सक्रीय बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा राज्यातील 12 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना होणार आहे, अशी माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठक झाली. यात बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणींमध्ये कामगारांना आर्थिक साहाय्य देण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार मंडळाकडे नोंद असलेल्या सक्रीय बांधकाम कामगारांना 2 हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी (DBT)पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकाससकाकडून उपकर वसूल करुन मंडळाकडे जमा करण्यात येतो. मंडळाकडे जमा उपकर निधीमधून नोंदीत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयाप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येईल. राज्यातील 12 लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांना हे आर्थिक सहाय्य मिळेल.

संबंधित बातम्या : कराडमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात निरोप

जिल्हाबंदी मोडून पुण्यापर्यंत जाऊन दाखव, हुल्लडबाजांची पैज, सोलापुरातील दोघांवर गुन्हा

कल्याणमध्ये दूध चोरांचा सुळसुळाट, लॉकडाऊनमध्ये दूध पुरवणाऱ्या वितरकांची लूटमार

4 दिवसांचं बाळ, दोन नर्स, दोन वॉर्ड बॉय, एका आयाला कोरोना, वसई-विरारमध्ये 13 नवे रुग्ण

Announcement for construction labour by Thackeray Government

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.