AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Corona | कोरोना थोपवणाऱ्या बीडमध्ये पहिला बळी, मुंबई-पुण्यातून जिल्ह्यात आलेले कोरोना पॉझिटिव्ह

बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाबाधित आढळलेल्या 65 वर्षीय महिलेचा (Beed corona positive death) पहाटे मृत्यू झाला.

Beed Corona | कोरोना थोपवणाऱ्या बीडमध्ये पहिला बळी, मुंबई-पुण्यातून जिल्ह्यात आलेले कोरोना पॉझिटिव्ह
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 18, 2020 | 10:37 AM
Share

बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाबाधित आढळलेल्या 65 वर्षीय महिलेचा (Beed corona positive death) पहाटे मृत्यू झाला. कालच तिच्यासह सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. संबंधित महिला ही मूळची नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होती. ती मुंबईहून सांगवी येथे नातेवाईकांकडे आली होती. बीडमध्येच त्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला. उपचारादरम्यान आज पहाटे या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे. आता बीड जिल्ह्यात एकूण आठ कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. (Beed corona positive death). बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या 29 स्वॅब पैकी प्रलंबित राहिलेले सात स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये 5 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे. त्यामुळेच कोरोनाला रोखण्यास प्रयत्न करणाऱ्या जिल्हा वासियांच्या चिंतेत भर पडली आहे.

हे 7 जण 13 मे रोजी मुंबईहून निघाले होते. 14 तारखेला आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाईकांकडे आले होते. हे सर्व पिंपळगाव खुडा अहमदनगर येथील रहिवाशी आहेत.

दुसरीकडे काल बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील इटकूर मध्ये 1 रुग्ण तर माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावात 1 रुग्ण पॉझिटिव्ह सापडला होता. हे दोघेही मुंबई-पुण्याहून चोरट्या मार्गाने बीडमध्ये आले होते.

त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली. त्यापैकी एका 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पुण्याहून आलेल्यांनी तपासणीसाठी पुढे येऊन संसर्ग टाळावे असे आवाहन बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी केले आहे. गेवराई आणि माजलगाव येथील आढळून आलेले 2 रुग्ण चोरट्या मार्गाने बीड जिल्ह्यात दाखल झाल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासनाकडून माहिती न लपविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(Beed corona positive death)

संबंधित बातम्या  

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात दिवसभरात सर्वाधिक 2347 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजार पार

Follow Us
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
मोठी बातमी! दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला, पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी कमानीखाली दबून महिलेने गमावला जीव