AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुकसानाची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे बांधावर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा शब्द

अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानाचा आढावा घेत शेतकऱ्यांना मदतीचा शब्द दिला.

नुकसानाची पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे बांधावर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा शब्द
sagar joshi
sagar joshi | Updated on: Oct 18, 2020 | 3:35 PM
Share

बीड: परतीच्या पावसानं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. बीड जिल्ह्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. सोयाबीन, कापूस, तूर, ऊस अशा अनेक पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बांधावर जात झालेल्या नुकसानाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाचा आढावा मुंडे यांनी घेतला. ( Dhananjay Munde on field for inspection of damage)

अतिवृष्टीमुळं खरिप पिकाचं आतोनात नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांचं काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या हुंडी वाहून गेल्या. अनेकांच्या सोयाबीनला बुरशी लागली. पांढरं सोनं म्हणवणारा कापूसही भिजला. तर शेकडो हेक्टर फडावरील उभा ऊस आडवा झाला. त्यामुळं खरिपाच्या पिकावर पाहिलेली स्वप्नही मातीमोल झाली. अशा परिस्थितीत झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी अनेक मंत्री, विरोधी पक्षातील नेते सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी केली. गेवराई तालुक्यातील हिरापूर, इटकूर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर अशा गावांमध्ये मुंडे यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी केली.

मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करु असा शब्दही धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला. विरोधी पक्षनेत्यांना बिहार निवडणुकीपुढे इथलं दु:ख दिसत नाही. मात्र, सत्ताधारी पक्षातील सर्वच नेते शेतकऱ्यांचं दु:ख जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष बांधावर जात आहेत, अशी टीकाही मुंडे यांनी फडणवीसांवर केली.

शरद पवार आज मराठवाड्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळं उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची त्यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. पवारांनीही महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा शब्द इथल्या शेतकऱ्यांना दिला. दरम्यान, शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळे आपण राज्यातील खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं पवारांनी सास्तूरमध्ये सांगितलं. केंद्र सरकारलाही मदतीसाठी विनंती करणार असल्याचं पवार यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्रीही उद्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सोमवारपासून सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.  यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसाचा दौरा असणार आहे. ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत.

संबंधित बातम्या:

ऐशी वर्षांच्या योद्ध्याची बळीराजासाठी धडपड, शरद पवारांच्या मराठवाडा दौऱ्याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याला मर्यादा, मदतनिधीसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार – शरद पवार

Dhananjay Munde on field for inspection of damage

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...