AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sai Lokur | ‘मराठी बिग बॉस’ फेम सई लोकूर प्रेमात, चाहत्यांसोबत शेअर केला आनंद

‘मराठी बिग बॉस’ (Bigg Boss) फेम अभिनेत्री सई लोकूरने (Sai Lokur) तिच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. एका खास व्यक्तीसोबत फोटो पोस्ट करत तिने प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे.

Sai Lokur | ‘मराठी बिग बॉस’ फेम सई लोकूर प्रेमात, चाहत्यांसोबत शेअर केला आनंद
| Updated on: Sep 29, 2020 | 5:37 PM
Share

मुंबई : सेलिब्रिटी आणि त्यांची अफेअर्स प्रत्येक चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. नुकतेच ‘मराठी बिग बॉस’ (Bigg Boss) फेम अभिनेत्री सई लोकूरने (Sai Lokur) तिच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. एका खास व्यक्तीसोबत फोटो पोस्ट करत तिने प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे. परंतु ही व्यक्ती पाठमोरी असल्याने, तो नेमका कोण?, या प्रश्नाने तिच्या चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे (Bigg Boss Marathi fame Actress Sai Lokur Confess her love).

इन्स्टाग्राम अकाउंटवर सईने (Sai Lokur) तिचा आणि तिच्या जोडीदाराचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. याखाली ‘गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात या गोष्टीवर माझा विश्वास बसला आहे. कारण मला माझा जोडीदार मिळाला आहे,’ असे कॅप्शन लिहिले आहे. त्यासोबतच #inlove असा हॅशटॅगसुद्धा तिने या फोटोला दिला आहे.

या फोटोनंतर सई पुन्हा एकदा सोशल मिडीयावर चर्चेत आली आहे. ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे, ती व्यक्ती नेमकी कोण आहे? तिचा हा जोडीदार चित्रपट सृष्टीतला आहे की सामान्य माणूस?, असे एक ना अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.

View this post on Instagram

I have every reason to believe that matches are made in heaven. And I finally found mine… ❤️ #inlove?

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

बिग बॉसच्या घरात रंगीली होती सई-पुष्कर मैत्रीची चर्चा

कलर्स मराठी वाहिनीचा ‘मराठी बिग बॉस’ (Bigg Boss) हा कार्यक्रम प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. मराठी बिग बॉसचे पहिले पर्व, त्यातील स्पर्धकांमुळे खूपच चर्चेत आले होते. त्यातील एक स्पर्धक अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) हिनेदेखील या कार्यक्रमातून स्वत:चा असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. स्पर्धेदरम्यान, ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) घरात तिची मेघा धाडे, पुष्कर जोग यांच्यासोबत असलेली मैत्री देखील चांगलीच गाजली होती. विशेषतः सई लोकूर आणि पुष्कर जोग यांच्या मैत्रीची चर्चा बिग बॉसच्या घराबाहेर देखील चांगलीच रंगली होती (Bigg Boss Marathi fame Actress Sai Lokur Confess her love).

लॉकडाऊन दरम्यान चाहत्यांशी संवाद

कोरोना लॉकडाऊन दरम्यानच्या काळात सई लोकूर (Sai Lokur) तिच्या चाहत्यांशी सोशल मिडियाद्वारे संवाद साधत होती. या काळात येणार ताणताणाव, नैराश्य यातून बाहेर पडण्यासाठी ती चाहत्यांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन करत होती. सोशल मिडियाच्या माध्यमातूनच तिने, आपण प्रेमात पडलो असून आपल्याला आपला योग्य जोडीदार मिळाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

कपिल शर्मासह चित्रपटात झळकली होती सई

बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी सई लोकूर 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील झळकली होती. या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

(Bigg Boss Marathi fame Actress Sai Lokur Confess her love)

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.