चोरीच्या गुन्ह्यात बापाला अटक, मुलाची रेल्वेखाली आत्महत्या, रेल्वेतून मृतदेह पाहताना खांबाला धडकून प्रवासी जखमी

चोरीच्या गुन्ह्यात बापाला अटक झाल्यामुळे, बदनामीच्या भीतीने, उपवर युवकाने रेल्वेखाली (Jalgaon youth suicide) येऊन आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं ही घटना घडली.

चोरीच्या गुन्ह्यात बापाला अटक, मुलाची रेल्वेखाली आत्महत्या, रेल्वेतून मृतदेह पाहताना खांबाला धडकून प्रवासी जखमी

जळगाव : चोरीच्या गुन्ह्यात बापाला अटक झाल्यामुळे, बदनामीच्या भीतीने, उपवर युवकाने रेल्वेखाली (Jalgaon youth suicide) येऊन आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं ही घटना घडली. मनोज रवींद्र प्रजापती-कुंभार असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. (Jalgaon youth suicide)

रावेर येथील कुंभारवाड्यातील प्रकाश सीताराम प्रजापती यांच्या घरातून 34  हजार 500 रुपये किमतीचे 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचा शिक्का आणि पाच हजार रोख असा 39 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. त्याबाबत त्यांनी रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.

या घटनेनंतर 5 तासांतच पोलिसांनी संशयावरुन रवींद्र नारायण कुंभारला ताब्यात घेतले. त्याने चोरी केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर सायंकाळी 5.50 वाजता रवींद्र यांचा मुलगा मनोजने बदनामीच्या भीतीने रावेर रेल्वेगेटजवळ बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या रेल्वेखाली आत्महत्या केली. या प्रकरणी भुसावळ जीआरपीत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

रेल्वेतून बाहेर डोकावून पाहताना प्रवासी जखमी

दरम्यान रुळांच्या बाजूला पडलेला मनोजचा मृतदेह चालत्या रेल्वेतून पाहताना कर्नाटक एक्सप्रेस (डाऊन) मधील उत्तर प्रदेशचा प्रवाशाच्या डोक्याला, लोखंडी खांबा लागून तो जखमी झाला. जखमीला उपचारासाठी जळगावला हलवण्यात आलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI