AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलंदशहर हिंसेचा मास्टर माईंड पोलिसांच्या ताब्यात

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : बुलंदशहरच्या स्याना पोलिस ठाण्याअंतर्गत येण्याऱ्या एका शेतात गायीचे अवशेष आढळल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. त्यानंतर संतप्त जमावाने चिंगरावठी चौकीला घेराव घालत पोलिसांवर दगडफेक केली आणि गोळ्या झाडल्या. यामध्ये पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. त्यानंतर परिसरात मोठा गोंधळ झाला. ही हिंसा घडवून आणणाऱ्यांचा तपास पोलिसांनी सुरु केला. सोमवारी रात्रीच […]

बुलंदशहर हिंसेचा मास्टर माईंड पोलिसांच्या ताब्यात
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM
Share

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : बुलंदशहरच्या स्याना पोलिस ठाण्याअंतर्गत येण्याऱ्या एका शेतात गायीचे अवशेष आढळल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. त्यानंतर संतप्त जमावाने चिंगरावठी चौकीला घेराव घालत पोलिसांवर दगडफेक केली आणि गोळ्या झाडल्या. यामध्ये पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. त्यानंतर परिसरात मोठा गोंधळ झाला. ही हिंसा घडवून आणणाऱ्यांचा तपास पोलिसांनी सुरु केला. सोमवारी रात्रीच पोलिसांनी या प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे, तर 75 लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. देवेंद्र, चमन आणि आशीष अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आता ही हिंसा घडवून आणणाऱ्या मुख्य आरोपीचे नावही उघड करण्यात आले आहे. योगेश राज या व्यक्तीवर लोकांना भडकवण्याचा आरोप आहे. तर योगेश राज (जिल्हा अध्यक्ष, प्रवीण तोगडिया ग्रुप), उपेंद्र राघव (बजरंग दल), शिखर अग्रवाल (माजी अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा) या तिघांवर सुबोध कुमार यांच्या मृत्यूचा आरोप आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, योगेश राजने आपल्या साथीदारांसोबत मिळून लोकांना भडकवले. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास जेव्हा हा जमाव पोलीस चौकीवर पोहोचला, तेव्हा पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक शांत व्हायला तयार नव्हते. या दरम्यान काही समाजकंटककांनी सुबोध कुमार सिंह यांची बंदूक आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. तसेच वायरलेस सेटही तोडला. बुलंदशहरात त्या दिवशी नेमकं काय घडलं? सोमवार ३ डिसेंबरला बुलंदशहरच्या स्याना पोलीस ठाण्याअंतर्गत येण्याऱ्या एका शेतात गायीचे अवशेष आढळले. यावरुन तेथे वाद पेटला. याची माहिती मिळताच सुबोध कुमार सिंह यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. एफआयआर दाखल होत असतानाच तीन गावातून 400च्या जवळपास लोकांचा जमाव ट्रॅक्टरमध्ये गायीचे अवशेष घेऊन येत होता. त्यांनी चिंगरावठी पोलीस ठाण्याला घेराव घातला. यानंतर लोकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. या विरोधात जमावावर लाठीचार्ज केला. पण जमावाकडून झालेल्या गोळीबारात सुबोध कुमार सिंह हे जखमी झाले. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुबोध कुमार सिंह यांच्या डोक्यात गोळी लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला, असे बुलंदशहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...