AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते : छगन भुजबळ

वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal).

वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते : छगन भुजबळ
| Updated on: Feb 16, 2020 | 11:23 PM
Share

नाशिक : वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal). महाराष्ट्र गोवा बार काउंसिल आणि नाशिक बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वकील परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत होते.

“कोर्टात एखादे वकील मोठ्याने बोलतात तर कोणी हळू बोलतं. मात्र, सिनेमात जशी मजा दाखवली जाते तशी मला कोर्टात दिसली नाही. सत्य बाहेर काढण्याची गरज आहे. मात्र होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं करतो तोच मोठा वकील”, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

देशातील काही भागांमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात चिडफाड होत आहे. ते गरजेचं आहे. कारण काही ठिकाणी लोकांना त्रास होत आहे. सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर अप्रत्यक्ष टीका केली (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal).

“सर्वच मंत्री चांगले नसतात, सर्वच वाईटही नसतात. मात्र, जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही नक्की करणार”, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. याशिवाय नाशिकला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केला.

“कोणत्याही खटल्यात मीडिया ट्रायल आधी निकाल लावून मोकळी होते. जो दोषी नाही त्याला त्रास होता कामा नये. मात्र, आता मीडियातच निकाल लागून जातो”, असंदेखील छगन भुजबळ म्हणाले.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.