कोरोनाची भीती घालवण्यासाठी पुण्यात चिकन फेस्टिवल, मांसाहारप्रेमीच्या रांगा

कोरोना व्हायरसमुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला (Chicken festival pune) आहे. वेगवेगळ्या अफवांनी पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

कोरोनाची भीती घालवण्यासाठी पुण्यात चिकन फेस्टिवल, मांसाहारप्रेमीच्या रांगा
Follow us
| Updated on: Mar 02, 2020 | 10:54 AM

पुणे : कोरोना व्हायरसमुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला (Chicken festival pune) आहे. वेगवेगळ्या अफवांनी पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अफवा खोट्या असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुण्यात चिकन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मोठा उस्फूर्त प्रतिसाद (Chicken festival pune) मिळाला आहे.

नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी आणि व्हेंकिज यांच्या वतीने चिकन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलं होते. या फेस्टिवलमध्ये नागरिकांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगाच रांगा लागल्या होत्या. लखनवी झायका आणि हैदराबादी लझिझ केवळ 90 रुपयात मिळत होते. त्यामुळे मोठी गर्दी झाल्याने इथं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कोरोना व्हायरसच्या खोट्या अफवेमुळे चिकन विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे चिकनचा प्रचार आणि प्रसारासाठी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलमध्ये तब्बल पाच हजार नागरिकांनी चिकनचा आस्वाद घेतल्याचं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्येही पोल्ट्री असोसीएशनकडून चिकन मेला आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे या मेळाव्यात तब्बल 30 रुपयात फुल प्लेट चिकन प्लेट दिली जात होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे चिकन प्रेमी जमा झाले होते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.