“करावे तसे भरावे”, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची शरद पवारांवर टीका

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Shalini patil criticized on sharad pawar) यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

"करावे तसे भरावे", माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची शरद पवारांवर टीका

मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Shalini patil criticized on sharad pawar) यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पवारांवर टीका केली आहे. “करावे तसे भरावे”, असं म्हणत शालिनी पाटील (Shalini patil criticized on sharad pawar) यांनी पवारांवर निशाणा साधला.

वसंतदादा पाटील महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते होते. 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांना झटका देत शरद पवार वयाच्या 37 व्या वर्षी मुख्यमंत्री बनले होते. राजकारणात तेज आणि हुशार असे व्यक्तीमत्व असलेला नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवारांनी त्यावेळी काँग्रेस सरकार पाडून स्वत: मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागले होते. महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ त्यावेळी उडाली होती.

“शरद पवारांनी ज्याप्रकारे वसंतदादा पाटील यांच्यासोबत केले होते. त्यांच्यासोबतही तसेच झाले पाहिजे. जे आता अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन केले आहे. करावे तसे भरावे”, असं शालिनी पाटील म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे नेते उमुख्यमंत्री अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत मिळून भाजपचे सरकार बनवले. 22 नोव्हेंबर पर्यंत अजित पवार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत होते. पण अजित पवार यांनी आमदारांच्या समर्थनाच्या पत्रासोबत थेट भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी शपथ घेऊन राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला.

दरम्यान, 1978 रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (एस) ला 69 आणि काँग्रेस (आय) ला 65 जागांवर विजय मिळाला होता. तर जनात पक्षाला 99 जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येत सत्तास्थापन केली. पण कालांतराने शरद पवार यांनी 38 आमदार फोडून जनता पक्षाला समर्थन देत स्वत: मुख्यमंत्री बनले. त्यावेळी शरद पवारांमुळे वसंतदादा पाटील यांना धक्का बसला होता.

Published On - 4:45 pm, Mon, 25 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI