AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown | नरेंद्र मोदींच्या निर्णयाला कॉंग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर-चिदंबरम यांचा पाठिंबा

लॉकडाऊन वाढवण्याची सक्ती आम्ही समजू शकतो. आम्ही या निर्णयाचे समर्थन करतो' असं ट्वीट माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी केलं आहे. (Congress Leader Shashi Tharoor P Chidambaram supports Lockdown)

Lockdown | नरेंद्र मोदींच्या निर्णयाला कॉंग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर-चिदंबरम यांचा पाठिंबा
| Updated on: Apr 14, 2020 | 12:24 PM
Share

नवी दिल्ली : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन आणखी 19 दिवसांनी वाढवला आहे. नरेंद्र मोदींच्या निर्णयाला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर आणि पी चिदंबरम यांनी ट्विटरवरुन पाठिंबा दर्शवला आहे. (Congress Leader Shashi Tharoor P Chidambaram supports Lockdown)

‘लॉकडाऊन विस्ताराच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचे मी समर्थन करतो. मात्र जे आपली दैनंदिन निकड भागवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मोदींनी दिलासादायक निर्णय जाहीर करायला पाहिजे होते. मनरेगाची देयके, जनधन खाती, राज्यांना जीएसटी थकबाकी आणि मदत दिली असती, तर सोन्याहून पिवळं झालं असतं’ असं ट्वीट कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी केलं आहे.

‘आम्हीही पंतप्रधानांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. लॉकडाऊन वाढवण्याची सक्ती आम्ही समजू शकतो. आम्ही या निर्णयाचे समर्थन करतो’ असं ट्वीट माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी केलं आहे.

‘गरीबांना 21 + 19 दिवस स्वत:ची काळजी स्वतःच घेण्यासाठी वाऱ्यावर सोडले आहे. पैसा आहे, अन्न आहे, परंतु सरकार पैसे किंवा अन्न देत नाही.’ असं म्हणत चिदंबरम यांनी टीकाही केली आहे.

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन आणखी 19 दिवसांनी वाढवला आहे. म्हणजेच 3 मेपर्यंत ‘लॉकडाऊन 2’ चा कालावधी असेल. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. देशाला संबोधित करताना त्यांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले. (Congress Leader Shashi Tharoor P Chidambaram supports Lockdown)

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....