Corona Updates : देशभरात 24 तासात विक्रमी 27,114 नवे कोरोना रुग्ण, सपाच्या आमदारालाही संसर्ग

| Updated on: Jul 11, 2020 | 1:43 PM

देशात पहिल्यांदाच 24 तासात 27,114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या 8 लाख 20 हजार 916 पर्यंत पोहचली (Total corona patient in India).

Corona Updates : देशभरात 24 तासात विक्रमी 27,114 नवे कोरोना रुग्ण, सपाच्या आमदारालाही संसर्ग
Follow us on

नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच 24 तासात 27,114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच 519 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 20 हजार 916 पर्यंत पोहचली आहे (Total corona patient in India). यापैकी आतापर्यंत 22 हजार 123 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात 2, लाख 83 हजार 407 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत उपचारानंतर एकूण 5 लाख 15 हजार 386 रुग्ण बरे झाले आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार सुनील सिंह साजन यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास 1 कोटी 26 लाख झाली आहे. तसेच 5 लाख 62 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील अनेक देश या कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8,20,916 इतकी झाली आहे. आतापर्यंत 22,123 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 2,83,407 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 5,15,386 रुग्ण बरे झाले आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, राज्यात शुक्रवारी (10 जुलै) दिवसभरात सर्वाधिक 7 हजार 862 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update).  त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 38 हजार 461 वर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, तरीदेखील कोरोनाबाधितांचा वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे (Maharashtra Corona Update).

दिवसभरात 5 हजार 366 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज दिवसभरात 5 हजार 366 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.62 टक्क्यांवर पोहोचलं आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 32 हजार 625 रुग्ण बरे झाले आहेत. तर 95 हजार 647 रुग्णांवर उपचार सरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात दिवसभरात 226 रुग्णांचा मृत्यू

राज्यात शुक्रवारी (10 जुलै) दिवसभरात 226 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये फक्त मुंबई महापालिकेतील 73 रुग्णांचा समावेश आहे. राज्यात सध्या मृत्यूदर 4.15 टक्के एवढा आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 12 लाख 53 हजार 978 नमुन्यांपैकी 2 लाख 38 हजार 461 नमुने पॉझिटिव्ह (19.01 टक्के) आले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 74 हजार 25 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 46 हजार 560 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा :

Pune Lockdown | पुण्यात पाच दिवस दूध, औषधांशिवाय सर्व बंद, भाजी खरेदीसाठी झुंबड

धारावी झोपडपट्टीतील कोरोना संसर्गावर नियंत्रण, WHO कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 7 हजार 862 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 5 हजार 366 रुग्णांना डिस्चार्ज

Total corona patient in India