इगतपुरी : हातावर क्वारंटाईनचा शिक्का, तरीही भटकंती, कारवाईसाठी पथक घरी पोहोचताच 4 संशयित रुग्ण पसार

विदेशातून येणाऱ्या भारतीय नागरिकांना दोन आठवडे घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे (Nashik suspected patient absconding). मात्र, हा सल्ला विदेशातून येणारे भारतीय नागरीक गांभीर्याने घेत नसल्याचं वारंवार उघडकीस येत आहे.

इगतपुरी : हातावर क्वारंटाईनचा शिक्का, तरीही भटकंती, कारवाईसाठी पथक घरी पोहोचताच 4 संशयित रुग्ण पसार
Follow us
| Updated on: Mar 20, 2020 | 7:03 PM

नाशिक : विदेशातून येणाऱ्या भारतीय नागरिकांना 14 दिवस म्हणजेच दोन आठवडे घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे (Nashik suspected patient absconding). मात्र, हा सल्ला विदेशातून येणारे भारतीय नागरीक गांभीर्याने घेत नसल्याचं वारंवार उघडकीस येत आहे. नाशिकच्या इगतपुरी येथील चार कोरोना संशियत नागरिक हे ऑस्ट्रेलियातून आले होते. या चारही जणांना प्रशासनाकडून होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले होते (Nashik suspected patient absconding). मात्र, प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवत हे चारही जण खुलेआम फिरत असल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे हे चारही संशयित रुग्ण कुठल्यातरी पसार झाले होते. अखेर त्यांना शोधण्याच पोलिसांना यश आलं आहे.

नाशिकच्या इगतपुतरी येथील चार जणांचं एक कुटुंब काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला फिरायला गेलं होतं. या कुटुंबात पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं आहेत. या दाम्पत्याचा मोठा मुलगा हा 6 वर्षांचा आहे तर मुलगी अवघ्या एका वर्षाची आहे. हे कुटुंब नुकतंच ऑस्ट्रेलियातून भारतात आलं. त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी केल्यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले.

मात्र, प्रशासनाच्या या आदेशांना गांभीर्याने न घेता हे कुटुंब खुलेआम फिरत असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत प्रशासनाला कळताच त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक पथक त्यांच्या इगतपुरी येथील घरी गेलं. मात्र, पथक पोहोचण्याअगोदरच या कुटुंबाला त्याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे हे कुटुंब घरातून पसार झालं.

फरार कुटुंबियांना नाशिकात ताब्यात घेतलं

नाशिकमधील आरोग्य पथक त्यांच्या मागावर होतं आणि पोलिसांच्या मदतीने शोध सुरु होता. अखेर नाशिकला त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हे कुटुंब सापडलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या कुटुंबाचं जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तपासणी करुन पुढील निर्णय होणार असल्याची माहिती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

याअगोदरही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. पालघर रेल्वे स्थानकावर 18 मार्च रोजी चार संशयित रुग्ण आढळले होते. विशेष म्हणजे त्यांच्याही हातावर क्वारंटाईनचे शिक्के होते. हे चारही जण जर्मनीहून मुंबईत आले होते. त्यानंतर गरीबरथ एक्सप्रेसमधून ते चौघे सूरतला जात होते. मात्र त्या दरम्यान आजूबाजूच्या प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे या गाडीला पालघर स्थानकावर थांबा देत या संशयित रुग्णांना पालघरला उतरवण्यात आलं होतं.

संबंधित बातमी : Corona | हातावर विलगीकरणाचे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, पालघरजवळ चेन खेचून ट्रेन रोखली!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.