योग न केल्याने गांधींच्या नव्या पिढीला सत्तेचा योग नाही : बाबा रामदेव

| Updated on: Jun 19, 2019 | 8:04 PM

योग न केल्याने गांधींच्या नव्या पिढीला सत्तेचा योग आला नाही, असं म्हणत बाबा रामदेव यांनी गांधी घराण्यावर निशाणा साधला.

योग न केल्याने गांधींच्या नव्या पिढीला सत्तेचा योग नाही : बाबा रामदेव
Follow us on

मुंबई : येत्या 21 जून ला जागतिक योग दिवस साजरा केला जाणार आहे. यावेळी योग गुरु बाबा रामदेव हे महाराष्ट्रात असणार आहेत. बाबा रामदेव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नांदेडमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सार्वजनिकरित्या योग करतात. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी हे लपून योग करायचे. त्यांच्या नव्या पिढीने योग केला नाही, म्हणून त्यांची राजनिती बिघडली. योग करणाऱ्यांचे अच्छे दिन येतात’, असं म्हणत बाबा रामदेव यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली.

गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यावर बाबा रामदेवनेही काँग्रेसवर निशाणा साधला. योग न केल्याने गांधींच्या नव्या पिढीला सत्तेचा योग आला नाही, असा टोमणा गांधी घराण्याला बाबा रामदेव यांनी मारला.

जागतिक योग दिनासाठी अनेक देश सज्ज

21 जूनला जागतिक योग दिवस जगभर साजरा केला जाणार आहे. यासाठी अनेक देश जय्यत तयारी करत आहेत. तसेच, पंतप्रधान मोदीही यासाठी मोठी तयारी करत आहेत. मोदी नेहमीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पर वेगवेगळ्या यागक्रियांचे व्हीडिओ ट्वीट करत असतात. मोदींच्या प्रयत्नांनंतरच 11 डिसेंबर 2014 ला संयुक्त राष्ट्राने 21 जूनला जागतिक योग दिवस घोषित केलं. भारताच्या या प्रस्तावावर 170 पेक्षा अधिक देशांनी स्विकृती दर्शवली होती. तेव्हापासून दरवर्षी 21 जूनला जगभरात योग दिवस साजरा केला जातो. तर भारतात मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी योग दिनाचे आयोजन केले जाते.

संबंधित बातम्या :

फडणवीस = फडण दोन शून्य, बालभारतीचा वाद, अजित पवारांचंही सरकारला गणित

स्पेशल रिपोर्ट : शिवसेनेची 53 वर्षे, सेनेला मुख्यमंत्रिपद कसं मिळणार?

रामराजे नाईक-निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार?

नवनीत राणांना भाजपकडून ‘जय श्रीराम’ लिहिलेली 5000 पत्रं