फडणवीस = फडण दोन शून्य, बालभारतीचा वाद, अजित पवारांचंही सरकारला गणित

बालभारतीच्या दुसरीच्या गणिताच्या पुस्तकावरुन राज्यभर वादंग उठला आहे. बालभारती पुस्तकातील अंकवाचनातील बदलामुळे सरकारवर टीका होत आहेत.

फडणवीस = फडण दोन शून्य, बालभारतीचा वाद, अजित पवारांचंही सरकारला गणित
Follow us
| Updated on: Jun 19, 2019 | 7:08 PM

मुंबई : बालभारतीच्या दुसरीच्या गणिताच्या पुस्तकावरुन राज्यभर वादंग उठला आहे. बालभारती पुस्तकातील अंकवाचनातील बदलामुळे सरकारवर टीका होत आहेत. एकवीसऐवजी वीस एक, एकसष्ठऐवजी 60 एक अशी नवी पद्धती अवलंबण्यात येणार आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारला प्रश्न विचारला. अजित पवारांनी विधानसभेत एक मोबाईलनंबर वाचला. ते म्हणाले, “98220 अशी मोबाईल नंबरची सुरुवात असेल,  तर तो नंबर नव्वद आठ असा सांगितला तर लिहिणारा 908 असं लिहील. त्यामुळे सगळा गोंधळात गोंधळ आहे”

यावेळी अजित पवारांनी बालभारती वादावरुन सरकारवर हल्ला चढवला. “मोदीसाहेबांच्या नावावर निवडून येताहेत, डोकीच चालवत नाहीत. आपल्याला एकवीस, बावीस, त्र्यानव, चौऱ्यान्नव असं शिकवलं आहे, मग तुम्ही हे काय काढलं आहे?  तुम्ही सगळे सीनियर मंत्री आहात, याबाबत कुणीतरी सिरीयस घ्या”, असं अजित पवार म्हणाले.

फडणवीस, बावनकुळे कसं लिहायचं?

दरम्यान, बालभारतीच्या या नव्या प्रयोगामुळे सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. बालभारती जर एकवीसला वीस एक, बावन्नला पन्नास दोन म्हणायला सांगत असेल, तर फडणवीस, बावनकुळे ही आडनावेही तशीच म्हणायची का असा विनोद सोशल मीडियावर फिरत आहे.

बालभारतीचा नेमका वाद काय?

बालभारतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणिताच्या अभ्यासक्रमातील संख्या वाचनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार विद्यार्थ्यांना एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णवऐवजी नव्वद तीन अशा नव्या पद्धतीने संख्यावाचन करावे लागणार आहे. नुकतंच बालभारतीद्वारे इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रमात हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयाचा अभ्यास करणं सोपे जाईल अशी आशा बालभारतीला आहे.

संबंधित बातम्या 

बालभारतीचे भलते प्रयोग, ‘एकवीस’ऐवजी ‘वीस एक’   

बालभारती वाद : जे शिक्षण आमदाराच्या मुलाला, तेच गरिबाच्या पोराला हवं : बच्चू कडू 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.