AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pramod Sawant : उद्या गोव्यात शपथविधी, प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री, नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्या प्रमोद सावंत हे दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. उद्या होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थितीत असणार आहे. तर प्रमोद सावंत यांच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ मिळणार, किती पाहून उपस्थित असणार, याविषयी उत्सुकता शिगेला पोहचलीय.

Pramod Sawant : उद्या गोव्यात शपथविधी, प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री, नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?
उद्या गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत दुसऱ्यांदा विराजमान होणार.Image Credit source: tv9 marathi
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Mar 27, 2022 | 6:13 PM
Share

 मुंबई : नुकताच उत्तर प्रदेशातील शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचप्रकारे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) हे देखील दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. उद्या होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांची विशेष उपस्थितीत असणार आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गोव्याचा शपथविधी विशेष असल्याने याकडे उद्या देशभराचं लक्ष असणार आहे. कारण, गोव्याच्या 40 जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे काँग्रेसला एकत्र घेऊन विरोधकांची मोट बांधण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केला. त्याविषयी शिवसेना नेते संजय राऊतांनी अनेकदा बोलूनही दाखवलं. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसून आलं. यामुळे गोव्याच्या शपथविधीकडे देशभराचं लक्ष असणार आहे.

कसं असणार मंत्रिमंडळ?

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची प्रमोद सावंत दुसऱ्यांदा शपथ घेतील. डॉ. शामप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रमोद सावंत शपथविधी सोहळा पार पडेल. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात 11 नव्या मंत्र्यांचा समावेश होण्याची सूत्रांची माहिती आहे. तर या शपथविधीला सोहळ्याला अनेक दिग्गज नेते, उद्योजकांची उपस्थिती असण्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.

अखेर रस्सीखेच थांबली!

गोव्यात मुख्यमंत्रीपदावरुन रच्चीखेच सुरु असल्याचं यापूर्वी अनेकदा बोललं गेलं. गोव्याच्या राजकारणात त्यामुळे एकदा चढाओढही पाहायला मिळाली होती. याआधीच विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंत यांच्यातील स्पर्धाही अनेकदा चर्चिली गेलेलीय. अशातच निवडणुकीतील विजयानंतर विश्वजीत राणेंनी मतदारांचे आभार मानताना जाहिरातही प्रसिद्ध केली होती. मात्र या जाहिरातीमध्ये प्रमोद सावंत यांचा फोटो कुठेच दिसून आला नव्हता. मात्र, प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्यानं अखेर मुख्यमंत्रीपदी सुरू असलेली रस्सीखेच थांबली.

भाजपचं पारडं जड

गोव्यात भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत. अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये, एलेक्सियो रेजिनाल्डो लॉरेंसो आणि एंटोनियो वास यांनी आधीच भाजपला समर्थन दिलेलं आहे. तसेच एमजीपीचे आमदार रामकृष्ण ढवळीकर आणि जीत अरोलकर यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपकडे बहुमतापेक्षाही अधिकचं संख्याबळ आहे.

गोव्याची चर्चा का?

गोव्याचा शपथविधी विशेष असल्याने याकडे उद्या देशभराचं लक्ष असणार आहे. कारण, गोव्याच्या 40 जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेसला एकत्र घेऊन विरोधकांची मोट बांधण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केला. त्याविषयी अनेकदा शिवसेना नेते संजय राऊतांनी बोलूनही दाखवलं. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांचे प्रयत्न फोल ठरल्याचं दिसून आलं. यामुळे गोव्याच्या शपथविधीकडे देशभराचं लक्ष असणार आहे.

इतर बातम्या

Pune| अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नियमावली जाहीर

माजी नगरसेवक Nitish Gwalwanshi यांचा काँग्रेसला हात, नितीन गडकरींच्या घरी भाजपात प्रवेश

पडळकरांचा गनिमी कावा, एकदा नाही, दोनदा नाही, पडळकरांनी तीनदा करून दाखवलं, सरकार बघत राहिलं

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली