AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांसाठी Good News! 600 गाड्यांची आवक झाल्याने भाज्या स्वस्त, वाचा काय आहेत भाव

घाऊक बाजारात आज जवळपास 600 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.

सर्वसामान्यांसाठी Good News! 600 गाड्यांची आवक झाल्याने भाज्या स्वस्त, वाचा काय आहेत भाव
एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण
| Edited By: | Updated on: Oct 26, 2020 | 4:13 PM
Share

मुंबई : परतीच्या पावसामुळे सर्वच पिकांचं नुकसान झालं होतं. पण आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. भाजीपाला बाजारात आवक वाढल्यानं सर्वसामान्यांनी आता सुटकेचा श्वास घेतला आहे. घाऊक बाजारात आज जवळपास 600 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. (Good news vegetables rate cheaper due to the arrival of 600 vehicles know what are the prices)

भाज्यांचे दर हे पुन्हा स्थिर झाले आहेत. पुणे, नाशिक, नगर, कर्नाटक, गुजरात, जळगाव, लातूर या सर्व ठिकाणांहून आज गाड्यांची आवक मोठया प्रमाणावर झाली आहे अशी माहिती भाजीपाला मार्केटचे व्यपारी श्यामराव मोहिते पाटील यांनी दिली आहे.

Gold Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 5521 रुपयांची घसरण

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती. परंतु जवळपास 8 महिन्यांनंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये गाड्यांची आवक सुरळीत झाली असून भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. काय आहे भाज्यांच्या किंमती पाहुयात…

काकडी 8 ते 12 रु किलो दुधी 15 ते 20 रु किलो मिरची 30 ते 45 रु किलो शिमला मिरची 25 ते 40 रु किलो भेंडी – 20 ते 30 रु गवार -35 ते 45 रु किलो कोबी-20 ते 30 रु किलो फरसबी-45 ते 55 रु किलो विकला जात असून शेवगा-45 ते 55 रु किलो रताळे-25 ते 30 रु किलो कोथिंबीर-10ते 15 जुडी मेथी-15 ते 20 जुडी वाटाणा-100 ते 120 रु किलो टोमॅटो-20 ते 25 रु किलो विकला जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद; शेलारांची खोचक टीका

दरम्यान, सध्या भाज्यांच्या किंमतीत जी घसरण झाली आहे दिवाळीपर्यंत अशीच राहणार असल्याची माहिती भाजीपाला मार्केटच्या संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात आज कांदा बटाटा मार्केटमध्ये 120 गाड्यांची आवक झाली आहे. 90 गाड्या कांद्याच्या तर 26 बटाट्याच्या गाड्या आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गेल्या गगनाला भिडले होते. त्याच बरोबर बटाटा भावातही वाढ झाली होती. कांदा हा 80 ते 90 रुपये प्रतिकिलोने विकला जात होता. पण आता 20 ते 60 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. त्याच बरोबर बटाटा 40 रुपये किलोने विकला जात होता पण आता 20 ते 30 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला उठाव नसल्यानं कांद्या व बटाट्यामध्ये घसरण झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

(Good news vegetables rate cheaper due to the arrival of 600 vehicles know what are the prices)

BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.