AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरीची साडी आवडली नाही, लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव पसार

कर्नाटकमध्ये एका लग्न समारंभात नवरीच्या साडीची क्वॉलिटी आवडली नसल्यामुळे नवरदेवाने लग्न (Groom fraud with bride in karnatak) मोडले.

नवरीची साडी आवडली नाही, लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव पसार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Feb 08, 2020 | 3:26 PM
Share

बंगळुरु : कर्नाटकमध्ये एका लग्न समारंभात नवरीच्या साडीची क्वॉलिटी आवडली नसल्यामुळे नवरदेवाने लग्न (Groom fraud with bride in karnatak) मोडले. ही घटना कर्नाटकमधील हासन जिल्ह्यातील आहे. विशेष म्हणजे नवरदेवाने आपल्या आई-वडिलांच्या सूचनेवरुन लग्न मोडले आणि लग्नाच्या एक दिवसआधी तो घरातून निघून (Groom fraud with bride in karnatak) गेला. बी एन रघुकुमार असं नवरदेवाचे नाव आहे.

नवरीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. “नवऱ्याने आपल्या आई-वडिलांच्या सांगण्यानुसार हे कृत्यू केले आहे”, असा आरोप नवरीच्या कुटुंबियांनी केला आहे.

“रघुकुमार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे. रघुकुमारच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, असं हसनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

रघुकुमार आणि बीआर संगीता गेल्या एक वर्षापासून रिलेशनमध्ये होते. कुटुंबियांची परवानगी मिळाल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही कुटुंब एकत्र आले. लग्नात नवरीसाठी जी साडी खरेदी करण्यात आली होती. त्या साडीच्या क्वॉलिटीवर नवरदेवाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद झाले. तसेच नवरदेवाच्या कुटुंबियांनी लग्न तोडण्याचा निर्णय घेत नवरदेवाला घरातून पळून जाण्यास सांगितले. गुरुवारी (6 फेब्रुवारी) लग्न होणार होते आणि बुधवारी ( 5 फेब्रुवारी) नवरदेव पळून गेला. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली