AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही हात नाहीत, पायाने पेपर लिहिले, गुण मिळाले…..

उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने पायाने परीक्षेत पेपर लिहिला (Writing with leg) आहे.

दोन्ही हात नाहीत, पायाने पेपर लिहिले, गुण मिळाले.....
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Feb 29, 2020 | 11:45 AM
Share

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने पायाने परीक्षेत पेपर लिहिला (Writing with leg) आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत त्याला 59 टक्के मिळाले आहे. अमर बहादुर असं या दिव्यांग मुलाचे नाव आहे. अमरच्या या कामगिरीमुळे संपूर्ण अमेठी जिल्ह्यात त्याचे कौतुक होत आहे. अमरला लहानपणापासून दोन्ही हात नाहीत. हात नसले तरीही त्याने पायने पेपर लिहित सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेठी जिल्ह्यात सध्या अमरच्या नावाची जोरदार चर्चा (Writing with leg) सुरु आहे.

अमर बहादुरने आपल्या जिद्दीच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अमर हा खूप जिद्दी आहे, असे त्याच्या आईने सांगितले. याच जिद्दीच्या जोरावर त्याने शाळेतील परीक्षा पायाने लिहून त्यात यश मिळवलं आहे.

अमरने सर्व पेपर आपल्या पायाने लिहिले आहेत. तसेच त्याला या परीक्षेत 59 टक्के मिळाले. त्याची टक्केवारी पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

“लहानपणापासून त्याचे हात व्यवस्थित नाहीत. पहिले आम्ही त्याला जेवण भरवत होतो. पण आता तो स्वत: च्या पायाने जेवतो. त्याला शिकण्याची खूप आवड आहे. पण पैशामुळे आम्ही चांगल्या शाळेत त्याचे शिक्षण करु शकत नाहीत. पण जर सरकारकडून मदत झाली तर बर होईल. नोकरी मिळाली तर हा पुढे जाऊन शिकू शकेल. लहानपणापासून तो विभागातील मुलांना शिकवतो”, असं दिव्यांग अमरची आई केवला देवीने सांगितले.

“परीक्षेच्या निकालाने माझा विश्वास वाढला आहे. मी आणखी मेहनत करणार आणि शिक्षक बनणार. तसेच देशाचे आणि समाजाचे नाव रोषन करणार. सरकारने मदत केली तर पुढे पण शिकणार”, असं दिव्यांग अमरने सांगितले.

दरम्यान, अमर हा मोबाईल मॅकेनिकसुद्धा आहे. पायाने मोबाईल उघडतो आणि तो तयार करतो. हे काम त्याच्यासाठी कठीण नाही. यामधून जे काही पैसे मिळतात ते तो शिक्षणासाठी वापरतो.

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट