Beed Rain | बीडमधील सिद्धेश्वर बंधारा ओव्हरफ्लो, गेवराई नदीवरील पूल वाहून गेला

बीड जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही.

Beed Rain | बीडमधील सिद्धेश्वर बंधारा ओव्हरफ्लो, गेवराई नदीवरील पूल वाहून गेला
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 11:23 AM

मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आला आहे. तर आंबेसावळी नदीदेखील खळखळून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीलादेखील पाणी आले आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही. | Heavy rain in Beed Siddheshwar dam over flow Gevrai river pool